नाशिक ग्रामीण

देवळा-नाशिक रस्त्यावर भावडे फाट्याजवळ नाशिक-साक्री बस पलटी

सुदैवाने जीवितहानी नाही

दि.१४ नोव्हेंबर २०२५

मनोज वैद्य /देवळा प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील भावडे फाट्याजवळ दुपारच्या सुमारास तीव्र उतारावर दुचाकीला व रस्त्यावर काम करीत असलेल्या मजूरांना वाचवण्याच्या प्रयत्नात नाशिकहून साक्रीकडे जाणाऱ्या ( क्रमांक एम, एच २० बी, एल, २६६१) बसचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या विरुध्द बाजूला १० ते १२ फूट खोल शेतात जावून पलटी होऊन झालेल्या अपघातात बसमधील ३६ पैकी ६ प्रवाशी जखमी झाले असून त्याच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सूरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत बस मधिल प्रवाशांना बाहेर काढून जखमींना रुग्णालयात पाठण्यास मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पहानी केली.


याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री – शिर्डी ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गीवर भावडे फाट्या नजिक तीव्र उतारावरील रस्त्यावर संबधित ठेकेदाराचे मजूर रस्ता कटि़गचे काम करीत होते. व एक बाजू बंद करण्यात आली होती. मात्र रस्त्यावर काम चालू असतांना वाहन चालकास ठळकपणे निदर्शनास येतील असे अडथळे उभे केले नसल्याने व त्याच वेळेस समोरून येत असलेल्या दुचाकी स्वारासह रस्त्यावरील मजूरांना वाचवण्या प्रयत्नात तीव्र उतार असल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस विरुध्द बाजूला शेतात जावून पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही तर बस पलटी झाली त्या जागेच्या अगदी काही अंतरावर शेतात पाण्याने भरलेली विहीर होती. जर बस अलीकडेच थांबली नसतीतर मोठा अनर्थ घडला असता.

या घटनेने काही वर्षी पूर्वी देवळा सौंदाणे रस्त्यावर देश विदेश हॉटेलजवळ झालेल्या बस अपघाताची आठवण जागी झाली.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!