
नांदगाव तालुक्यात खासदारांची पाहणी
नांदगाव तालुक्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी तालुक्यातील नागापूर, पानेवाडी, मोहेगाव, भालुर, लक्ष्मीनगर, मांडवड, मोरझर, पोखरी, जळगाव खुर्द, पिंपरखेड, न्यायडोंगरी आणि फुलेनगर या गावांना भेट दिली.
खासदार भगरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकरी बांधवांशी भावनिक संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की,
- एकही शेतकरी पंचनाम्यातून सुटता कामा नये.
- सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य भरपाई मिळाली पाहिजे.
- निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही, पण तुम्ही खचून न जाता नव्या जोमाने उभे रहा.
शेतकऱ्यांच्या वेदना
- भालुर गावातील ७० वर्षीय शेतकरी आजोबा स्वतःच्या शेतातील मोडलेले मका कणीस आणि खराब झालेले कांदा रोप खासदारांना दाखवण्यासाठी घेऊन आले होते.
- मोहेगाव येथे आदिवासी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे खराब झाले होते. खासदार भगरे यांनी वस्तीत जाऊन आदिवासी बांधवांना धीर देत सांगितले की, “तुम्हाला भरपाई मिळेल, काळजी करू नका.”
- लक्ष्मीनगर येथे खासदारांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की, “प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करा, कुणालाही वंचित ठेवू नका.”
पिकांची स्थिती
संपूर्ण तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून दोन दिवसांनंतरही
- मका, बाजरी, कांदा यासारख्या पिकांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे.
- काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले पिक सोडून देण्याची वेळ आली आहे.
सोबत असलेले अधिकारी व मान्यवर
खासदार भगरे यांच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, तहसीलदार सुनील सौंदाणे, गटविकास अधिकारी श्री. खताळे, कृषी अधिकारी रवींद्र डमाळे, तलाठी सचिन ढगे, कृषी सहाय्यक रवींद्र आहीरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सागर पवार, गोविंद सोमासे, सखाराम भुसनर, आंण्णा काकळीज, साहेबराव गायकवाड, विठ्ठल आहेर, संजय आहेर, समाधान थेटे, सुशील आंबेकर, दत्ता निकम, रमेश निकम, गणपत निकम तसेच लक्ष्मीनगर येथील दिनकर सोनवणे, योगेश सोनवणे, पुंजाराम जाधव, संजय उगले, डॉ. अंकुश उगले आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण दौऱ्यात खासदार भगरे यांनी शेतकरी व आदिवासी बांधवांना धीर देत, शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.



