वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१९ ऑगस्ट २०२५ :- शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी यापूर्वी वापरली जाणारी लकी ड्रॉ पद्धत आता बंद करण्यात आली आहे. शासनाने नवे धोरण लागू केले असून, त्याअंतर्गत जो शेतकरी सर्वप्रथम अर्ज करेल, त्याला प्राधान्याने लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत लकी ड्रॉ पद्धतीमुळे अर्ज करूनही संधी मिळेलच याची खात्री नव्हती. मेहनतीने अर्ज भरूनही अनेक शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याने असंतोष निर्माण होत असे. आता मात्र फर्स्ट कम–फर्स्ट सर्व्ह या तत्वानुसार पहिला अर्ज करणारा शेतकरी थेट लाभार्थी असणार आहे. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरला असून, यामुळे योजनांमध्ये पारदर्शकता, न्याय्यता वाढेल आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
◆ शेतकऱ्यांना नेमका फायदा?
पारदर्शकता वाढणार
वेळेत अर्ज करणाऱ्याला हमखास लाभ
भ्रष्टाचाराला आळा बसेल
योजनांविषयीचा विश्वास वाढेल
◆ महत्त्वाच्या योजना
पीक विमा योजना
सिंचन सुधारणा योजना
शेतीसंबंधित अनुदान
शेतकरी कर्ज सुविधा
आधुनिक शेती साधन योजना
◆ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम २०२५ पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे विविध अनुदानाच्या योजनांसाठी सोडत पद्धती ऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणाचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाडीबीटी प्रणालीद्वारे आवश्यक घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
सुधाकर पवार
तालुका कृषी अधिकारी, निफाड
◆ शेतकऱ्यांचा प्रतिसाद
लकी ड्रॉमुळे आमचं भाग्यावर अवलंबून राहायचं. अर्ज केला तरी हातात काही यायचं नाही. आता पहिला अर्ज केल्यावर संधी नक्की मिळेल ही खात्री मिळाली.
रमेश शेळके,
सेंद्रिय शेती पुरस्कर्ते