वेगवान मराठी : मारुती जगधने
” दि 22 नोव्हेंबर 2025 ”
नांदगाव, भुसावळ विभाग – नांदगाव–पिंपरखेड या दरम्यान उभारण्यात आलेल्या तिसऱ्या रेल्वे लाईनची संरक्षात्मक तपासणी मुख्य संरक्षा आयुक्त (कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी), सेंट्रल सर्कल यांच्या हस्ते 24 नोव्हेंबर 2025 रोजी केली जाणार आहे. या तपासणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उच्च वेगाने इंजिन स्पीड चाचणी घेण्यात येईल.
तपासणीच्या वेळेत गाडी उच्च वेगाने धावणार असल्याने रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. रेल्वे ट्रॅकजवळ जाणे, ट्रॅक ओलांडणे अथवा कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करणे धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पशुपालकांनीही आपल्या जनावरांना रेल्वे मार्गाजवळ चरण्यास सोडू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्यास ही सेफ्टी चाचणी सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडणार असल्याचा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मध्य रेलवे, भुसावल मंडल



