- या रेल्वे रेस्वेस्टेशन वर दर्जेदार सुविधा प्रवाशांना
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगांव [दि . 16 सप्टेंबर 2025 ]
मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदगाव, मनमाड, लासलगाव, चाळीसगाव तसेच अन्य महत्त्वाच्या स्थानकांवरील सुशोभीकरण व दुरुस्तीची कामे आता पूर्णत्वास आली आहेत. या कामांचा भव्य उद्घाटन सोहळा दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.? उद्घाटनासाठी स्थानक परिसरात सजावट, एलईडी स्क्रीन आणि ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात येत असून स्थानिक प्रवासी व नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
✦ कामांचा खर्च
या प्रकल्पांतर्गत नांदगाव, मनमाड, लासलगाव व चाळीसगाव या प्रमुख स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यात प्रवासी सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
✦ सुशोभीकरणातील प्रमुख कामे
नव्या प्रवासी प्रतीक्षालयांचे बांधकाम व नूतनीकरण
अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट, एस्केलेटर व रॅम्पची व्यवस्था
डिजिटल डिस्प्ले बोर्ड, सीसीटीव्ही सुरक्षा कॅमेरे व एलईडी दिशादर्शक फलक
परिसरात सुशोभित बागा, फवारे व प्रकाशयोजना
शौचालये, पिण्याच्या पाण्याची स्वयंचलित सुविधा व यांत्रिक तिकीट प्रणाली
✦ स्थानिक लोकप्रतिनिधींची मते
माजी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले की, “या विकासकामांमुळे प्रवाशांना महानगरांप्रमाणे सुविधा मिळतील. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.”
आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले की, “मध्य रेल्वे विभागातील या प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल.”
नांदगाव नगरपरिषद माजीअध्यक्ष राजेश कवडे यांनी मत व्यक्त केले की, “नांदगाव स्थानकाचा चेहरा बदलल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.”
प्रवाशांचा प्रतिसाद
स्थानिक प्रवासी संघटनांनी समाधान व्यक्त करताना असे नमूद केले की, या सुविधा दररोज हजारो प्रवाशांना मोठा दिलासा देणाऱ्या ठरणार आहेत. विशेषतः नांदगाव व लासलगावसारख्या कृषी क्षेत्रांमधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असल्याने या स्थानकांचा दर्जा उंचावणे हा योग्य निर्णय आहे



