नाशिक ग्रामीण

रुग्णवाहिकेतच अश्लील प्रस्ताव; आशा वर्करची तक्रार, चालकावर गुन्हा दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१९ ऑक्टो २०२५ :- नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून परतत असलेल्या आशा वर्कर महिलेला रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका थांबवून अश्लील प्रस्ताव दिला. या प्रकरणी संबंधित आशा वर्करने निफाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय ३५, रा. कानळद, ता. निफाड) या आशा वर्कर दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास १०२ रुग्णवाहिकेने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून विंचुरकडे जात होत्या. शिवरे फाट्याच्या पुढे आल्यानंतर रुग्णवाहिका चालक भाऊसाहेब गुडघे (रा. निमगाव वाकडा, ता. निफाड) याने गाडी थांबवली. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या गळ्यात हात घालत तिच्या छातीस हात लावून “माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवशील का?” असा अश्लील प्रस्ताव मांडला.
या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक त्रास झाला असून तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. निफाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३३६/२०२५ भा.दं.सं. (बीएनएस) कलम ७४, ७५(१)(ii) अंतर्गत दाखल केला आहे.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गणेश गुरव व पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ढिकले करत आहेत. या प्रकरणामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा १०२ अँब्युलन्स सेवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!