ग्रामपंचायत अंतर्गत तांडा वस्ती आराखडा बेकायदेशीर असलेल्या निवेदनाची घेतली दखल
ग्रामपंचायत अंतर्गत तांडा वस्ती आराखडा बेकायदेशीर असलेल्या निवेदनाची घेतली दखल

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला: दिनांक :17 :ऑक्टोबर /येवला तालुक्यातील ग्रामपंचायत ममदापूर येथील तांडा वस्ती आराखडा सन २०२३-२४
हा बेकायदेशीर केलेबाबत देविदास सयाजी गुडघे सामाजिक कार्यकर्ता रा. ममदापूर ता. येवला जि. नाशिक यांनी दि. ०१/०९/२०२५ दि. ३०/०९/२०२५ रोजी पंचायत समिती, येवला अंतर्गत ग्रामपंचायत ममदापूर ता. येवला येथील मा.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना या योजने अंतर्गत आराखडा सन २०२३- २४ ते २०२७- २०२८ या वर्षातील बृहत आराखडा सादर करण्यात आलेला होता. परंतु सदर तांडा वस्ती आराखडा हा ग्रामपंचायतीचे काही ठराविक सदस्य व ग्रामसेवक यांनी मनमानी करून ग्रामसभेत न मांडता तयार करण्यात आला आहे आणि तो बेकायदेशीर असले बाबत संदर्भीय पत्रात कळविण्यात आलेले होते. ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत ममदापूर ता. येवला यांनी सदर तांडा वस्ती आराखडा सन २०२३-२४ ते २०२७-२८ याची चौकशी होई पावेतो आणि पुढील आदेश होईपावेतो सदर तांडा वस्ती मधील मंजूर कामे सुरु करण्यात येऊ नये व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास विनाविलंब सादर करून अर्जदार यांना आपले स्तरावरून परस्पर कळविण्यात यावे याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते देविदास सयाजी गुडघे यांनी
संदीप वायाळ गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती, येवला
तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परीषद नाशिक, जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते.याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर दखल घेत निवेदनात नमूद केलेले काम स्थगित करण्यात यावे असे येवला पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी पत्र काढले आहे.
कोट :-ग्रामपंचायत ममदापूर ता. येवला येथील मा.वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत आराखडा सन २०२३- २४ ते २०२७-२०२८ या वर्षातील बृहत आराखडा बेकायदेशीर असल्याबाबत निवेदन सादर केले होते.निवेदनाची दखल घेत संपूर्ण चौकशी होईपर्यंत कामे स्थगित करण्यात यावे असे पत्र काढण्यात आले आहे परंतु ज्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे त्या पारदर्शकता व चौकशीतून न्याय मिळावा एवढी अपेक्षा
श्री देविदास गुडघे पाटील
सामाजिक कार्यकर्ते ममदापुर



