नाशिक ग्रामीण

देवळा तालुक्यातील पंचायत समिती ६ गण व जिल्हा परिषद ३ गटांचे आरक्षण जाहीर

पंचायत समितीवर राहणार महिलाराज

मनोज वैद्य/ देवळा

देवळा पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गासाठी निघाल्यानंतर आज सोमवारी दि.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वाजगाव रोडवरील नवीन तहसील कार्यालयात निरीक्षक व उपविभागीय अधिकारी कैलास कडलग व प्राधिकृत अधिकारी तथा देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत लकी आव्हाड या लहान मुलांच्या हस्ते सहा गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली.

देवळा तालुक्यातील एकूण सहा गणा पैकी तीन गण गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. आरक्षण जरी तीन जागांसाठी महिलांचे असले तरी सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या जागेसाठी राखीव असल्याने व नागरिकांचा मागास प्रवर्ग हे गणाचे आरक्षण मेशी गणात निघाल्याने त्या ठिकाणहून देखील सभापती पदासाठी स्त्री उमेदवार निवडून येणे शक्य असल्याने त्यामुळे पंचायत समितीमध्ये महिलाराज पाहावयास मिळणार आहे.

तर जिल्हा परिषदेच्या तीन पैकी दोन गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि एक गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
दरम्यान, देवळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्याने काही इच्छुकांची हिरमोड झाला आहे. तर काही इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*गणांचे आरक्षण

1)खर्डे (अ.जा.स्त्री)
2)लोहणेर (अ.ज.)
3)मेशी (ना.मा.प्र.)
4)खालप (सर्व साधारण स्त्री)
5)उमराणे (सर्व साधारण स्त्री)
6)वाखारी (सर्व साधारण) याप्रमाणे आरक्षित झाले आहे.

*गटांचे आरक्षण

देवळा तालुक्यातील लोहोणेर व खर्डे (वा.) हे दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आणि उमराणे हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!