या रस्त्यावर दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. ७ ऑक्टोबर २०२५
नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर फुलेनगर येथील पुलाजवळ दुपारच्या सुमारास दोन मोटरसायकलींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.
जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी बाहेर हलविण्यात आले. अपघातातील जखमींपैकी एकाचे नाव ओम बाबासाहेब (पूर्ण नाव न कळलेले), रहिवासी निमगाव, ता. येवला असे आहे. उर्वरित तिघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही मोटरसायकलींचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला. धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत ॲम्बुलन्सद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघातात एका व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला असून इतरांना डोक्याला, कमरेला, हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
या अपघातात सहभागी दुचाकींचे क्रमांक एमएच १५ वाय ३८४८ (होंडा सिटी १००) आणि एमएच ३८ एबी २१८५ असे आहेत. घटनेची नोंद नांदगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहेः



