नाशिक ग्रामीण

या शाळेत स्वच्छता पंधरवडा साजरा

या शाळेत स्वच्छता पंधरवडा साजरा

*
वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला: दिनांक :4 ऑक्टोबर / येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ठाणगाव येथे महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला,
त्या अंतर्गत स्वच्छतेचे महत्व सांगणारे पथनाट्य, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले
होते
या स्पर्धेत श्रेया जाधव,मनाली कोंढरे,ज्ञानेश्वरी शेळके,भूमी साळवे,वक्तृत्व स्पर्धेत सायली शेळके, राघव पानसरे,प्रगती शेळके, प्रगती जाधव, देवकी शेळके,

चित्रकला स्पर्धेत काव्यांजली शेळके,सिध्दी खरात,पृथ्वीराज शिरसाठ,
मोठा गट निबंध स्पर्धेत श्रद्धा पानसरे,पुजा वाघ,वक्तृत्व स्पर्धेत ईश्वरी शेळके, ज्ञानेश्वरी भवर,विद्या शेळके,चित्रकला स्पर्धेत जान्हवी घुसळे,सिध्दार्थ घुसळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश मिळविले यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोंढरे, उपाध्यक्ष गोरखभाऊ घुसळे यांचे स्वखर्चातून ट्रॉफ्या देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देविदास शेळके मा. उपसभापती येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, युवानेते जनार्दन भवर,माजी उपसरपंच कृष्णा कव्हात,पाटोदा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र कुशारे, चिंचमळा शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव होंडे मा.शा.व्य.स.अध्यक्ष शिवाजी जाधव,विष्णू शेळके, कृष्णा शिरसाठ,राम कव्हात,संजय दत्तू वाघ,योगेश कोंढरे,अनिल नेहरे,किरण जाधव,संतोष कांभीरे,किरण साहेबराव शेळके,शितल घुसळे इ.उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरज झाल्टे तर आभाराचे काम उद्धव वाघमारे यांनी केले तसेच सूत्रसंचालन सविता शिरसाठ व रंजना मडके यांनी केले.

प्रतिक्रिया
ठाणगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छता पंधरवडा साजरा केला खरोखर हा राबविलेला उपक्रम स्तुत्य तर आहेतच परंतु जागृत असलेली शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांना बक्षीसांच्या माध्यमातून प्रेरणा देते हे सुद्धा कार्य अतुलनीयच म्हणावे लागेल
राजेंद्र कुशारे
केंद्रप्रमुख पाटोदा

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!