Uncategorized

डायल ११२ आपत्कालीन सेवेला खोटी माहिती दिली १ अटकेत 

Nandgaon News

डायल ११२ आपत्कालीन सेवेला खोटी माहिती दिली १ अटकेत 

वेगवान मराठी : मारुती जगधने

॥ दिनांक: १४ ऑक्टोबर २०२५ ॥

नांदगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४४८/२०२५, भा.दं.वि. कलम २१२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी धर्मराज अंबादास अलगट  नांदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पितांबर अशोक पवार (वय ३४, रा. आमोदे, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांनी शासनाने स्थापन केलेल्या डायल ११२ आपत्कालीन सेवेला खोटी माहिती दिली.

आरोपीने १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास ०२:०७ वाजता फोन करून सांगितले की अमोदे  येथे चार लोकांची मारहाण झाली असून, एक व्यक्ती जखमी अवस्थेत आहे.” या माहितीनुसार पोलिसांनी तसेच १०८ अँब्युलन्स सेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तपासाअंती समजले की ही माहिती खोटी असून कोणतीही घटना घडलेली नव्हती.

पोलिस तपासात स्पष्ट झाले की आरोपी पितांबर पवार यांनी जानबूजकर शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने डायल ११२ व १०८ या आपत्कालीन सेवांचा गैरवापर केला.

तपास अधिकारी: API प्रवीण मोरे
दाखल अधिकारी: अंमलदार पो.ह.वा./४०८ बस्ते
सदर नोंद: नांदगाव पोलिस ठाणे (ना.प्रा.)


सारांश:
एका व्यक्तीने शासनाच्या आपत्कालीन सेवांना खोटी माहिती दिल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल झाली. या कृत्याबद्दल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. आणि सदर व्यक्तीला अटक केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!