नाशिक ग्रामीण

दिंडोरी नाशिक रस्त्यावर जीवित हानी

वेगवान नाशिक/सागर मोर

वणी-नाशिक रस्त्यावर श्रीहरी रेस्टॉरंटजवळ शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनाची भीषण धडक होऊन एक तरुण जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (MH 15 JW 5717) व दुचाकी (MH 15 HP 7342) यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवर असलेला अमोल भगवंत गवारी (वय २१, रा. वणी परिसर) हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाला. त्याच्यासोबत प्रवास करणारे अनिल सुखदेव गवारी (वय २५) व गोपी सुरेश गवारी (वय २०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपळगाव येथे हलविण्यात आले.

कळते की, हे तिघेही गडा वर दर्शन करून दुचाकीने घरी परतत असताना हा अपघात झाला. अचानक समोर आलेल्या पिकअपशी झालेल्या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला.

दरम्यान, अपघातानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे वणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर मोर

पत्रकार क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असून सी- न्यूज, दैनिक देशदूत, वेध न्यूज, उत्तर महाराष्ट्र टाईम न्युज, दैनिक लोकनामा या नामवंत न्यूज चैनल व दैनिकातून परिसरातील सामाजिक राजकीय शेतीविषयक असे लिखाण वेगवान न्यूज चैनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!