नाशिक ग्रामीण

अरे बापरे वणीत तब्बल एवढ्या कोटींचे मोबाईल परस्पर विकले

वेगवान नाशिक/ सागर मोर
वणी: कसबे वणी येथील क्रिएशन टेलिकॉम होलसेल मोबाईल दुकानात तब्बल ६ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अमोल जीवनलाल समदाडिया (रा. कसबे वणी, ता. दिंडोरी) यांच्या दुकानात सेल्स मॅनेजर, अकाउंटंट व सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या आरोपींनी संगनमत करून, ग्राहकांकडून मोबाईल विक्रीतून आलेल्या रकमेची नोंद ठेवली मात्र ती प्रत्यक्षात बँक खात्यात जमा केली नाही.
याशिवाय, विवो कंपनीचे सुमारे ३४९६ मोबाईल विविध मॉडेल्सची परस्पर विक्री करून अंदाजे ६ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी परेश माणकचंद बोहरा (रा. कसबे वणी), प्रविण अरुण धनाईत (रा. नाशिक), रॉबिन विल्सन जोसेफ (रा. नाशिकरोड), संदिप हेमराज शिंपी (रा. सातपूर, नाशिक) व नितीन गोकुळ परदेशी (रा. सिडको, नाशिक) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.सदर आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणाचा  पुढील तपास सपोनी गायत्री जाधव करीत आहे

सागर मोर

पत्रकार क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असून सी- न्यूज, दैनिक देशदूत, वेध न्यूज, उत्तर महाराष्ट्र टाईम न्युज, दैनिक लोकनामा या नामवंत न्यूज चैनल व दैनिकातून परिसरातील सामाजिक राजकीय शेतीविषयक असे लिखाण वेगवान न्यूज चैनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!