नाशिक ग्रामीण

कांद्या भावातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

रस्त्यावर कांदा टाकून शासनाचा निषेध

कांद्या भावातील घसरणीमुळे संतप्त शेतकऱ्यांचा खारीफाटा येथे कांदा रस्त्यावर टाकत रास्ता रोको

मनोज वैद्य/दहिवड


कांदाभावात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी देवळा तालुक्यातील खारीफाटा येथे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावर ओतत शासनाचा निषेध नोंदविला.

आज 16 सप्टेंबर रोजी खारीफाटा येथील रामेश्वर कृषी मार्केटमध्ये सुरू झालेल्या कांदा लिलावात कांद्याला सरासरी 800 ते 900 रुपयांचा बाजार भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत सौंदाणे ते वघई या राज्य मार्गावर कांदा टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त करत कांद्या भावावर योग्य तोडगा काढून शेतकऱ्याची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी सर्वच शेतकऱ्यांनी प्रशासना विरोधी रोष व्यक्त केला. यावेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साधारणपणे दोन तास चाललेल्या आंदोलनाने काही काळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अहिरराव तसेच पोलीस अधिकारी यांनी उपस्थित होत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची आश्वासन दिले.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!