Uncategorizedनाशिक ग्रामीण

“नेशन बिल्डर अवॉर्डने” देवळा रोटरी क्लब करणार शिक्षकांचा गुण गौरव

१४ सप्टेंबरला होणार पुरस्कारांचे वितरण

वेगवान न्यूज नेटवर्क

दि.१२ सप्टेंबर

देवळा येथील रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊनच्या वतीने देण्यात येणारे नेशन बिल्डर अवार्ड २०२५ नुकतेच जाहीर झाले असून शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या १३ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असताना समर्पण भावनेने काम करणाऱ्या व राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची व शाबासकीची थाप मिळावी व त्यांच्या कामातील उत्साह वाढत राहावा या उद्देशाने सदर पुरस्कार दिले जात असतात. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्राध्यापक शशिकांत निकम, जिजामाता कन्या विद्यालयाचे एस के आहेर, अभिनव बाल विकास मंदिर देवळा येथील पुनम पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वार्शी येथील हर्षाली अहिरराव, सिद्धेश्वर विद्यालय भऊर येथील केतन आहेर, जनता विद्यालय खडकतळे येथील पोपट विश्वास, जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड येथील मुरलीधर भामरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळा येथील सुजितकुमार अहिरराव, पिंपळेश्वर विद्यालय वाखारी येथील जमनादास अहिरराव तर तालुक्याबाहेरील पुरस्कर्त्यांमध्य हरणगाव तालुका पेठ येथील माध्यमिक शिक्षक धनंजय चव्हाण, ठाणगाव तालुका सुरगाणा येथील माध्यमिक शिक्षक मनोज प्रकाश वैद्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादूरी येथील शिक्षिका जयश्री शेवाळे यांचा समावेश आहे.

विशेष सरकारी वकील रोटे. ॲड.शिशिरभाऊ हिरे, शिवव्याख्याते प्रा यशवंत गोसावी, रोटरीचे उपप्रांतपाल प्रियंका बागड, उपप्रांतपाल अरुण पवार, देवळा टाऊनचे अध्यक्ष रोटे डॉ सुनील आहेर, सचिव रोटे दिनकर देवरे व सर्व रोटरीयन्स क्लब सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल येथे संपन्न होणार आहे.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!