निफाडःमहिलेची चिट्ठी लिहून आत्महत्या ; असं काय लिहिले चिठ्ठीत

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.५ सप्टें २०२५ :- निफाड तालुक्यातील पिंपरी शिवारात आज सकाळी एका ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मयत महिलेचे नाव सुजाता संतोष आहेर, वय ३६, रा.पिंपरी असे आहे. आज सकाळी अंदाजे नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास गावातील साहेबराव धनराज आहेर यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मृताच्या भावाने पोलिसांना दिली.
खबर मिळताच निफाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानंतर भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद (एम. क्रमांक ६७/२०२५) दुपारी ४.३७ वाजता करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास पो.निरीक्षक गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक आर. बाविस्कर करत आहेत. मृतदेह पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
◆ सुसाईड नोट व्हायरल
दरम्यान सदर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. संबधित सुसाईड नोट मध्ये निलेश साहेबराव आहेर याने दोन वर्षापासून शारीरिक मानसिक त्रास दिला आहे तसेच विनयभंग केला आहे. तो गावात माझी बदनामी करत आहे. याबाबत कुणाला सांगितले तर याचे परिणाम वाईट होतील अशी सतत धमकी देत असे.
याबाबत माझेकडे काही पुरावा नाही, मी याबाबत कुणाला सांगू शकले नाही. त्यामुळे मी या त्रासाला कंटाळून शेवटचे पाऊल उचलत आहे. माझ्या मृत्यू बाबत सासरच्या मंडळींचा काहीही सहभाग नाही, माझे पती, सासू व सासरे यांना यांना कुणीही दोष देऊ नये. मला त्रास देणारा निलेश साहेबराव आहेर याला कठोर शिक्षा द्यावी हि माझी अंतिम इच्छा आहे असे म्हटले आहे.
सदर सुसाईड नोट मधील आरोपी निलेश आहेर यास निफाड पोलिसांनी अटक केली असून मे.न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस रिमांड दिली आहे.




