महाराष्ट्र,देश
अखेर,,, सरकार झुकले,मराठ्यांना आरक्षण मिळाले… एका सामान्य माणसाने इतिहास घडवला.. !
नाशिक मध्ये भाजपकडून जल्लोषात स्वागत.सिन्नर तालुक्यांत आनंद उत्साह साजरा...

वेगवान नाशिक/ भाऊसाहेब हांडोरे
अखेर … सरकार झुकले.मरठ्यांना आरक्षण मिळाले , एका सामान्य माणसाने इतिहास घडवला… !
नाशिक / सिन्नर : दि , 3 सप्टेंबर 2025 — मराठ्यांच्या लढ्याला यश आले. मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे.. आता या गरजवंत मराठ्यांच्या समाज्याच्या लेकरांना नोकरीसाठी यापुढे मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल.. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाची लढाई सुरू होती.. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही. हे लक्षात घेऊन संघर्ष योद्धा. निस्वार्थी व प्रामाणिक.मराठा समाजाचा देवदुत मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबई वर चाल करून आपला लढा अधिक तीव्र केला.. बघता बघता देशाची आर्थिक राजधानी मुंबई मराठ्यांनी चक्का जाम केली.. अन् धडकी भरलेल्या या सरकारने याबाबत योग्य निर्णय घेतला व ” हैदराबादच्या गॅजेट्स नुसार मराठा आरक्षण लागू केले. मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील आंदोलनाला यश आले.सतारा व औंध संस्थान तर मुंबई गव्हर्नर साठी 31 डिसेंबर पर्यंत सरकारने वेळ घेतली. चाळीस वर्षे च्या मराठा आरक्षणचा लढा यशस्वी झाला असून एका सामान्य माणसाने इतिहास घडवला.. त्यामुळे आज या समाजाला सोन्याचा दिवस उजाडला असुन या विजयी आनंद उत्साह सोहळ्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघांतील प्रत्येक गावात एकच जल्लोष साजरा करण्यात आला आहे.. संपुर्ण महाराष्ट्रात गुलालाची उधळण केली व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये एक वेगळा उत्सव साजरा करण्यात आला आहे.. तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावांमध्ये या आंदोलनाला पाठिंबा दिला व एक घर.दोन भाकरी या उपक्रमात शहा.रामपुर. भरतपूर.पाथरे. वावी.सोमठाणे. लक्ष्मणपुर.कारवाडी. सांगवी.पागंरी. पंचाळे.देवपूर. मिठसागरे. या गावातील सर्व नागरिकांनी मोठे योगदान दिले व भाकरी घेऊन गेलेले युवक शेवटी विजयाचा गुलाल घेऊनच आले व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले..

नाशिक मध्ये भाजपकडून जल्लोषात आनंद उत्साह साजरा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
सिन्नर तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.. शहा येथील मराठा बांधवांकडून गुलालाची उधळण करीत फटाके वाजवून केला आनंद व्यक्त…




