नाशिक ग्रामीण

नाशिक:आता रुग्णांन ऐवजी ॲम्बुलन्स मध्ये दुचाकीचा प्रवास

वेगवान नाशिक / सागर मोर

वणी : अपघातग्रस्त ,गरोदर महीला ,व अत्यावश्यक उपचारासाठी आवश्यक असलेली रुग्णवाहीका वेळेवर उपलब्ध होत नाही मात्र या रुग्णवाहीकेतुन दुचाकीची वाहतुक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कळवण तालुक्यातील नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राची रुग्णवाहीका नांदुरी वणी रस्त्यावरुन मार्गक्रमण करत असताना या रुग्णवाहीकेत एक दुचाकी असल्याचे जागृत नागरीकाच्या निदर्शनास आले.

या बरोबर एक नर्स , महिला , एक एमपी डब्यु या रूग्णवाहीकेत असल्याचे दिसुन आले.दरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयासमोर सदर रुग्णवाहीका थांबविली असता सदर वस्तुस्थीती पुढे आली,याबाबत चालकाला विचारले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

दरम्यान औषधे व इतर रुग्णालयीन साहीत्य घेण्यासाठी जात असातील तर फार्मासीस्ट हवा या वाहनात होता किंवा कसे ? याबाबत तर्कवितर्क करण्यात येत आहे.दरम्यान अनेकदा रुग्णांना वेळेवर रुग्णवाहीका उपलब्ध होत नाही तेव्हा पदरमोड करुन खाजगी वाहनाचा पर्याय स्वीकारावा लागतो.

मात्र दुचाकीच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहीका उपलब्ध करुन देणारे धन्य व ही दुचाकी सुद्धा नशिबवान असेच म्हणावे लागेल या प्रकरणाची यथावकाश चौकशीही होईल मात्र त्याची फलनिष्पती काय निघेल याचे उत्तर वरीष्ठांनी शोधण्याची वेळ आली आहे.

सागर मोर

पत्रकार क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असून सी- न्यूज, दैनिक देशदूत, वेध न्यूज, उत्तर महाराष्ट्र टाईम न्युज, दैनिक लोकनामा या नामवंत न्यूज चैनल व दैनिकातून परिसरातील सामाजिक राजकीय शेतीविषयक असे लिखाण वेगवान न्यूज चैनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!