नाशिक ग्रामीण

नाशिक जिल्ह्यातील हा धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी मृत्यूच ठिकाण

मनोज वैद्य/ देवळा

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. त्यातच देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे या गावांच्या सरहद्दीवरील चोर चावडीचा धबधबा पर्यटकांचे लक्ष केंद्रित करीत आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी मालेगाव, नाशिक, चांदवड, धुळे, कळवण देवळा अशा विविध भागातून हौशी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी मालेगाव येथील काही हौशी पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी एक जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील माझ अन्सारी शाहिद अखतर, मो. अमदान अब्दुल हुसेन,
शर्जिल खान अमीर खान, मो. अनस नदीम सय्यद हे हौशी पर्यटक आपल्या मित्रांसोबत चोर चावडी या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. मात्र सदरील डोहांमधील मध्ये असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या त्यातील एक जण माझ अन्सारी शाहिद अख्तर रा. बिरादर बाग, मालेगाव हा बुडाला व मृत पावला. देवळा पोलिसांनी मालेगाव येथील शकील तैराकी यांच्या मदतीने सदरील मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला.

या आधी देखील कोरोना काळात वडाळीभोई येथील ३ जण, मागील महिन्यात मालेगाव येथील एक जण, व मागील आठ दिवसांपूर्वी मालेगाव येथील एक जण व आज पुन्हा एका व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाल्याने हे ठिकाण मृत्यूचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील मॅडम, पोलिस हवालदार खुरासने दादा, शिंदे दादा, नितीन बारहाते, व होमगार्ड टीम घटनास्थळी हजर झाले. सदर घटनेबाबत देवळा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!