लोकल बातम्या

,,, पदावर असताना तिसरे अपत्य झाल्यानं तालुक्यातील या ग्रा.प.च्या सदस्या चे सदस्यत्व रद्द… फक्त एकच सदस्य शिल्लक

ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी खरी माहिती लपवून ठेवली...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर : दिनांक, 24 ऑगस्ट 2025 – हम दो,हमारे दो,.. ! या शासकीय ब्रिजवाक्या प्रमाणे सार्वजनिक निवडणूक लढवताना काही मार्गदर्शक सूचना असतांना सुद्धा सिन्नर तालुक्यातील पुर्व भागातील कोळगाव माळ येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य असलेले तान्हाजी काळु ठाकर यांना निवडणूकी दरम्यान दोन अपत्ये होती.. परंतु श्री,ठाकर यांना काही दिवसांपूर्वी तिसरं अपत्य झाले. परंतु ठाकर व संबंधित ग्रामसेवक यांनी सदर माहिती लपवून ठेवली.. यासंदर्भात उत्तम मनोहर मोकळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात याचिका दाखल केली होती. या अनुषंगाने आज नाशिक अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्री, ठाकर याचं सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे जाहीर केले असल्याने सध्या या ग्रामपंचायतीमध्ये फक्त तिन च सदस्य शिल्लक राहिले आहे.त्यात सरपंच, व उपसरपंच यांचा समावेश आहे…

याबाबत सविस्तर माहिती अशी की या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सन,2021 मध्ये झाली आहे.  त्यात श्री, तान्हाजी काळु ठाकर यांनी वार्ड 1 मधुन आदिवासी ( एसटी ) राखीव या जागेवर निवडुन आले असून सध्या स्थितीत ते विद्यमान सदस्य आहेत. सदर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांना नामनिर्देशनपत्राद्वारे पत्नी माया तान्हाजी ठाकर , प्रथम मुलगी अश्विनी तान्हाजी ठाकर.तर दुसरी मुलगी कावरी तान्हाजी ठाकर व आई कांताबाई काळु ठाकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.व सदर अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला होता. सदस्य तानाजी ठाकर हे पत्नी ( माया) दोन मुली ( अश्विनी व कावेरी ) आई ( कांताबाई ) आणि गतवर्षी दिनांक २३ / ११ / २०२३ रोजी जन्माला आलेले तिसरे आपत्य ( वय – 1 वर्षे. 23 दिवस ) यांच्या सह कोळगाव माळ येथ वास्तव्यास आहेत. दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्याला सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही व अपात्र ठरविण्यात येईल.. म्हणजे च सदस्य, सरपंच, उपसरपंच,निवडुन येण्यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्य नसावी व निवडुन आल्यावर तिसरं अपत्य झाल्यास त्या व्यक्तीला अपात्र ठरविण्यात येते.. तसेच सदस्य श्री,ठाकर यांना दि. 23 /11/2023 रोजी तिसरे आपत्य झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी यांना असुनही त्यांनी सदर माहिती लपवून ठेवली असुन श्री, ठाकर यांना गेल्या एक वर्षापासून अधिकारी पाठीशी घालत होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य वाल्मिकी बाळासाहेब जुंधारे. तुळशीदास फकीरा भालेराव ,सौ, रंजना केशव कदम, सौ,रब्बाना निजाम पटेल.सौ,आयशा निसार पठाण. यांनी सदस्य ठाकर यांच्या विरोधात ग्रामविकास अधिकारी. गटविकास अधिकारी.  सिन्नर तालुका तहसीलदार.निवडणूक निर्णय अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे दि.2/12/24 रोजी याचिका सुपुर्द करण्यात आली होती. त्याअनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे यांनी संबंधित सदस्य श्री, तानाजी ठाकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे व तसा आदेश दिले आहेत… त्यामुळे ठाकर यांना तिसऱ्या अपत्य मुळे सदस्य पदाला मुकावं लागले.. तथापि सदर ग्रामपंचायतीच्या सरपंच च्या मनमानी कारभाराला कंटाळून पाच सदस्यांनी राजीनामे दिले आहे.त्यामुळे सध्या या ग्रामपंचायतीत नऊ सदस्यांपैकी सरपंच, उपसरपं सोडून दोन च सदस्य शिल्लक राहिले होते . त्यापैकी आता फक्त एकच सदस्य शिल्लक राहिले आहेत.. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय अधिकारी नेमावे कारभार प्रशासनाच्या ताब्यात देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

,,,  शासकीय नियमांच पालन करणे हे राजकीय लोकप्रतिनिधी यांनी पाळणे आवश्यक असते परंतु गावपातळीवर मात्र या नियमाला हरताळ फासला जात आहे.. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये तिसरं अपत्य असल्याची माहिती प्रत्येक ग्रामसेवकांना आहे परंतु सरपंच व ग्रामसेवक याचं आर्थिक साटेलोटे असल्याचे दिसून येते आहे त्यामुळे या ग्रामपंचायतींवर पंचायत समितीच्या अधिकारी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी तालुक्यातील नागरिक करत आहेत..

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 14 ( ज -1 ) या कायदेशीर तरतूद नुसार सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना दोन पेक्षा जास्त अपत्य नसावी व पदावर असताना जर तिसरं अपत्य झाले तर त्या व्यक्तीला अपात्र ठरविण्यात येते. या राजनैतिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या तालुक्यातील जनतेला सर्वंच ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधी सदस्य.सरपंच.उपसरपंच. यांचीही निरपेक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. व या प्रकरणी खरी माहिती लपवून दोषींना पाठीशी घालत असुन शासनाची दिशाभूल केली जात आहे त्यामुळे अशा ग्रामसेवकावर सुद्धा कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!