नाशिक ग्रामीण

देवळा तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाने केला पिंजऱ्यात कैद; जंगली क्ष्वापदांची संख्या वाढल्याने दहशत*!

देवळा तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाने केला पिंजऱ्यात कैद; जंगली क्ष्वापदांची संख्या वाढल्याने दहशत

मनोज वैद्य / देवळा
नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सद्या बिबट्यांचा वावर दिसून येत आहे, जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी यव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीसाठी शिवारात राहन्याऱ्या तसेच मानवी वस्ती जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी लहान मुले व महिला यांच्यावर हल्ला करून निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत, सद्या ते अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्ती कडे धाव घेत आहेत, गेल्या तीन चार दिवसा पासून लोहोणेर ते खालप रस्त्यावरील काळवट शिवारात जाधव व निकम वस्ती जवळ पिंजरा लावण्यात आला होता, यावेळी देवळा येथील वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष जाधव, वनपाल प्रसाद पाटील, विजय पगार, नामदेव ठाकरे, सुवर्णा इकडे, कल्पना गांगुर्डे, राजेंद्र भदाणे, देविदास आहेर यां वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावुन त्याला पिंजऱ्यात कैद केले. वनविभागाने बिबट्या पिंजऱ्यात कैद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून वन विभागाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

 

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!