नाशिक ग्रामीणनाशिक शहरमहाराष्ट्र,देश

रक्षाबंधन दिनी महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या तीन भामट्यांना पोळ्याच्या पूर्वसंध्येला अटक

Nandgdon News

रक्षाबंधन दिनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या संशयित आरोपींना पोळ्याच्या पूर्वसंध्येला अटक .

वेगवान मराठी : मारुती जगधने

[दि . 22 ऑगस्ट 2025 ]

नांदगाव – नांदगाव शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर नांदगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तीन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या हातात हातकड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून चोरटे पसार झाले होते.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त माहितीदारांची मदत घेतली. अखेर संशयितांचा शोध घेऊन पोलिसांनी सापळा रचून तीनही आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी सोनसाखळी हस्तगत केली असून, त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

➡️ या यशस्वी कारवाईसाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे .

महिलांच्या गळयातील मंगळसुत्रे ओरबडणारे तिघे संशयीत ताब्यात
सुमारे एक वर्षापासून सोन साखळी चोरुण फरार असलेल्या या संशयित आरोपींना
मोक्का कायद्या सह २४ गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होते .

सदर संशयित आरोपी सोमनाथ खलाटे यांच्या अखेर नाशिक ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत . घटणेतील नागरीक करंजगाव तालुका चाळीसगाव येथील महिला रक्षाबंधन सणासाठी नांदगाव हून मनमाड ला जात असताना नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल राज गार्डन समोर मोटरसायकल वरून वेगाने आलेल्या तिघा संशयतीनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे एक लाखाचे मंगळसूत्र ओरबाडले होते . नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजीवीर सिंग संधू ,उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गुन्हेगाराच्या शोधात होते .

गुन्हा उघडकीस आणण्याच्या तपास पथकांना सूचना होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने संशयतींना जेरबंद केले आहे .

त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल अहिल्यानगर जिल्ह्याचे दिशेने गेल्याची बातमी पोलीसांना मिळाली होती . त्यानुसार संबधीत पथकांनी विविध ठिकाणावरून या तिघानां ताब्यात घेतले .
यापैकी रामदास खलाटे याच्यावर नाशिक शहरातील आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापूर ,मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, नाशिक रोड, म्हसरूळ तसेच बुलढाणा व शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरून नेल्याचे एकूण २४ गुन्हे दाखल आहेत . नाशिक शहरात मोका कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून तो वरील सर्व गुन्हात वर्षापासून फरार होता .
किरण आजबे दिगंबर निकम यांच्यावर यापूर्वी खून दरोडा दोरी आर्म अँक्ट सारखे गुन्हे दाखल आहे .

पोलीस अंमलदार धनंजय शेलावट, संदीप , आबासाहेब मिसाळ, बाबासाहेब पवार ,हेमंत गिरी, प्रदीप बहिरम ,नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली .

सोमनाथ रामदास खराटे वय ३० खलाटेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड किरण अर्जुन आजबे व ३४ भिंगार अहिल्यानगर दिगंबर हरिचंद्र निकम वय ३० झारूळ तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी संशयीताची नावे असून यांच्याकडून टीव्हीएस आपाचे कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम ऐ१७ डीबी १२६५ ताबयात घेण्यात आली आहे .

तसेच त्यांनी सोन्याचे मंगळसुत्र अहिल्यानगर येथे सोनारास विकल्याचे कबूल केले असून पोलीस पुढील तपास करीत आहे .

या संदर्भातील गुन्हेगारी सराईत असून या गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हेगार जिल्हा बदलून चोरी करणे भामटेगिरी करणे महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या ओढणे मोटरसायकल चोरणे आधी गुन्हे यांच्यावर राज्यभरातून ठिकठिकाणी दाखल झाले आहे यापैकी अनेक गुण हे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यात दाखल आहे अशा या भांड्यांना पोलिसांनी उशिराने किंवा अटक केल्याने एक मोठे रॅकेट या माध्यमातून पुन्हा उघड होण्याची शक्यता आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!