विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे पीडित महिलेचे अमरण उपोषण उपोषणाचा चौथा दिवस मात्र अद्याप प्र शासनाकडून कोणतेही दखल नाही
Nandgaon /Nashik news
वेगवान मराठी : मारुती जगधने
नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्रीमती लक्ष्मीबाई गायकवाड या पीडित महिला शेतजमिनीचा न्याय मिळावा यासाठी चार दिवसापासून नाशिक येथे अमर उपोषण उपोषणासाठी बसलेले आहेत परंतु चार दिवसानंतरही त्यांना कोणत्याही न्याय न मिळाल्याने ते उपोषण कायम आहे .
नांदगाव स्थानिक पातळीवरती अमरण उपोषण आंदोलन आणि निवेदन देऊनही त्याचा कोणताही प्रशासनावरती आसर न झाल्याने सदर पीडित महिला श्रीमती लक्ष्मीबाई एकनाथ गायकवाड राहणार बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या महिला आपल्या मागण्यासाठी थेट नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालया समोर अमरण उपोषणासाठी बसल्या असून दिनांक 14 ऑगस्ट पासून त्यांचे अ मरण उपोषण सुरू आहे मात्र उपोषणाच्या चार दिवसापर्यंत त्यांच्याकडे कोणीही फिरकले नसून त्या आपल्या मागण्यांसाठी ठाम असून त्यांचे उपोषण चालू आहे .
श्रीमती गायकवाड यांच्या आमरण उपोषणाचा दिनांक 17 ऑगस्ट हा चौथा दिवस होता .श्रीमती गायकवाड यांनी विभागीय महसूल आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी उपोषण सुरू केलेला आहे .विभागीय नाशिक रोड कार्यालयाजवळ त्यांचे अमरण उपोषण चालू आहे .
त्यांच्या मागणीनुसार बोलठाण येथील गट नंबर 310 सर्वे नंबर 177 / १ ही जमीन त्यांच्या मालकीची असून या जमिनीचे हद्दी खुणा व मालकी हक्क बाबत त्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा उपोषण सुरू आहे .
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की त्यांना गुंड प्रवृत्त लोकांपासून त्रास होत असून गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना जमिनीचा ताबा घेऊ देत नाही आणि या सगळ्या जमिनीच्या संदर्भातल्या तक्रारींच्या बाबतीत त्या म्हणतात की जमीन माझ्या मालकीची असून यासंदर्भात शासकीय कार्यालयाकडून त्यांना मदत मिळत नाहीये त्यामुळे त्यांच्या विरोधातील जे लोक आहेत ते लोक त्यांना जुमानत नाही यापूर्वी त्यांनी नांदगाव येथे देखील आमरण उपोषण केले होते .
त्यावेळी त्यांन नांदगांवपोलीस निरीक्षक यांनी त्यांना आश्वासन देऊन ते उपोषण सोडले होते आणि त्यांच्या आश्वासनांची मात्र आद्यप पुरता न झाल्याने त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक येथे अमर उपाशन सुरू केलेले आहे .
त्याबद्दल त्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत .बोलठाण येथील गट नंबर 310 चा सर्वे नंबर 177 ऑब्लिक एक हे 15 आर क्षेत्र आहे या जमिनीवरील हद्दीच्या खुणा कायम करून मिळावा यासाठी या महिलेने उपोषण केलेले आहे सदर पीडित महिलेने नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालय यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केलेली आहे या संदर्भातल्या तक्रारी त त्यांनी जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक ग्रामीण ,नांदगाव तहसीलदार, नांदगाव पोलीस यांना देखील निवेदनाच्या प्रति वेळोवेळी सादर केलेले आहे परंतु त्यांना स्थानिक पातळीवर न्याय न मिळाल्याने त्यांनी आता थेट महसु ल आयुक्त कार्यालया समोरे उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या चार दिवसानंतर त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळाल्याने ते उपोषण कायम चालू आहे .।



