नाशिक शहर

वळण रस्ता नांदगावकरांसाठी पर्यायी मार्ग .

Nandgaon News

नांदगाव शहरातील वळण रस्ता वाहतुकीस दिलासा ? ?

वेगवान मराठी दि १३ ऑगस्ट नांदगाव शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या वाहतुकीमुळे रहिवासी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ट्रॅक्टर, ट्रक, बस आणि दुचाकी यांचा एकत्रित ताण वाढून वाहतूक कोंडीचे प्रसंग वारंवार घडत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून वळण रस्ता (बायपास रोड) उभारण्यात काळाची गरज बनली आहे .

 

नांदगाव शहरा बाहेरून जाणारा वळण रस्ता

सुमारे ५__किलोमीटर लांबीचा हा वळण रस्ता शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोका पर्यंत सुरू होऊन दक्षिण टोकाला संपतो. यामुळे शहरातून  जाणारी मालवाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहने थेट बायपासने मार्गक्रमण करू शकतील.यातून वाहतुकीचा गंभीर प्रश्न सुटून वाहतूक सुरळीत होऊ शकते दैनंदिन नाम का शहरातून जाणारी वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असते त्यामुळे याला पर्यायी म्हणून बायपास वळण रस्त्याचे अत्यंत आवश्यक आहे .

 

जर वळण रस्ता जर झालाच तर जास्त रस्त्याचे

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करतील, रस्ता पूर्ण क्षमतेने  झाल्यानंतर शहरातील ध्वनी व वायुप्रदूषण कमी होईल, तसेच रस्ते अपघातांचे प्रमाणही घटेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. तरनांदगाव शहरातील इंग्लिश स्कूल लक्ष्मी नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान तसेच विवेक हॉस्पिटल शिवनेरीवर आधारित बंगला रेल्वे मालधक्का मार्गमार्ग काही ठिकाणी अजूनही पाणी निचरा व फूटपाथाची कामे प्रलंबित असल्याचे लक्षात आले आहे. प्रशासनाने ही कामे लवकर पूर्ण गरज आहे.जर नांदगाव चव्हाण रस्ता झाला तर नांदगाव शहराच्या विकासाला हातभार लागू शकतो त्यामुळे अनेक लहान मोठे व्यवसायिक हायवे लगत होऊ शकतील आणि शहराचे विस्तार देखील होईल .सध्या नांदगाव शहरातून जाणारी वाहतूक चाळीसगाव औरंगाबाद मनमाड मालेगाव येवला या मार्गावर चालत असते .

 

कधीकधी बाजूच्या तालुक्यातील रस्त्यांवरती प्रॉब्लेम निर्माण झाल्यास वाहतूक नांदगाव शहरातून वळवली जाते आणि वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असतं आता तर सध्या नांदगाव शहरातून जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे फुटपाथ देखील जाम झालेले आहेत आणि त्यामुळे काय होतं दैनंदिन वाहतूक ठप्प होत असतं यावर उपाय म्हणजेच नांदगाव शहरातून जाणारा वळण रस्ता होय .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!