लोकल बातम्या

भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात ” दिव्यांग” जोडप्याचा विवाह सोहळा पार…. !

 

वेगवान मराठी /  भाऊसाहेब हांडोरे

दिव्यांग दांपत्याचा विवाह समारंभ उत्साहात पार पडला…..

सिन्नर दि , 11 ऑगस्ट  2025 —  तालुक्यातील नळवाडी येथे पातळेश्वर मंगल कार्यालयात दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी (रविवार) चिरंजीव विक्रम व चि. सौ. कां. वनिता या दोन्ही दिव्यांग दांपत्याचा विवाह समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या प्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना तालुका अध्यक्ष श्री संदीपभाऊ आव्हाड यांनी उपस्थित राहून नवविवाहित दांपत्यास मनःपूर्वक शुभाशिर्वाद दिले. तसेच श्री दत्तुभाऊ बोडके (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष), श्रीमती संध्याताई जाधव (महिला कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य), श्री अरुण जाधव (उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष), श्री अनिलभाऊ भडांगे (जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, नाशिक), श्री ललित पवार (जिल्हाध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटना, नाशिक), श्री सपन परदेशी (प्रहारसेवक, इगतपुरी तालुका) आणि श्री कैलास दातीर (तालुकाध्यक्ष,y सिन्नर प्रहार जनशक्ती पक्ष) यांसह मान्यवरांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री नवनाथ म्हस्के सर, दिव्यांग भगिनी सौ. सुनिता नारायण नागरे आणि श्री नरेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!