नाशिक ग्रामीण

सायगावमध्ये ‘यश पेट्रोलियम’ पंपाचा भव्य शुभारंभ;

सायगावमध्ये ‘यश पेट्रोलियम’ पंपाचा भव्य शुभारंभ;

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला: दिनांक: 11ऑगस्ट /कष्टांची जाणीव ठेवून शेतीसोबतच पूरक उद्योगात उतरण्याची गरज आहे. ग्रामीण भागात पूरक उद्योगांचा वेगाने विस्तार होत असून, यात युवकांनी नव्या संधी शोधून उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन गुरुवर्य पं.पू. मठाधीपती स्वामी रमेशगिरीजी महाराज (समाधी स्थान – जनार्दन स्वामी, बेट कोपरगाव) यांनी केले.

ते सायगाव ता येवला येथे पार पडलेल्या ‘यश पेट्रोलियम’ या नव्या पेट्रोल पंपाच्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी आता नोकरीच्या प्रतीक्षेत न राहता उद्योग सुरू करून गावातच रोजगार निर्माण करण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याचे उद्घाटन स्वामी रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला महंत श्री हरीव्यास बाबा अंकुळनेकर, कृष्णा बाबा अंकुळनेकर, प.पू. भास्करगिरी महाराज यांच्यासह सायगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री अंबादास सैंदर परिवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!