नाशिक ग्रामीण

निमगाव वाकडा येथील घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.९ ऑगस्ट २०२५ :- जुलै महिन्यात लासलगाव परिसरातील निमगाव वाकडा येथे घरफोडी करणाऱ्या आरोपीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दि.३१ ऑगस्ट रोजी लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत निमगाव वाकडा शिवारातील एका घरात घरफोडीची घटना घडली होती. या घरात राहणाऱ्या मिलींद ठेंगे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील गॅस टाक्या, तीन बर्नर, गृहपयोगी वस्तू तसेच रोख रक्कम यांचा सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८७/२०२५ भा.दं.सं. कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार नोंद करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास केला. तांत्रिक व माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केल्यावर स.पो.नि.भास्करराव शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिसांनी येवला परिसरातील सराईत गुन्हेगार रामा शांताराम लोखंडे, वय ३५, रा.सावरगाव, ता.येवला या आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. तपासात आरोपीने सदर घरफोडीची कबुली दिली आहे. हा आरोपी यापूर्वी येवला व कोपरगाव पोलीस ठाण्यांत घरफोडी, चोरी, दुखापत, आर्म्स अॅक्ट यासंबंधी ५ गुन्ह्यांसह गुन्हेगार म्हणून नाव नोंदवलेला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांचे पथक सक्रियपणे कारवाई करत आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!