दिंडोरी तालुक्यातल्या बिबट्यांची हिंमत वाढली, बिबटे पत्रेच तोडू लागले

वेगवान नाशिक / राजेंद्र जाधव
दिंडोरी :तालुक्यातील लखमापूर गावी शुक्रवारी मध्यरात्री दोन बिबट्यांनी पोल्ट्री फार्मचे छतावर चढून सिमेंट पत्रे तोडून आत प्रवेश केला शेतावरील मोगल वस्तीवर भरत दौलत मोगल यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्म अगदी घराजवळच असल्याने पत्रे तुटल्याचा आवाज झाल्याने सर्व बाहेर येऊन बघताच सर्वांना समोरील दृश्य बघून हादराच बसला एक नव्हे तर चक्क दोन बिबटे पोल्ट्रीत घुसून बसल्याचे आढळले
त्यांनी त्वरीत वणी वन विभागास कळविले त्यानुसार वनविभागाची टीम फॉरेस्ट कर्मचारी एस.एस कामडी वनरक्षक फोफशी, व ज्ञानेश्वर वाघ वन रक्षक वरखेडा,हेमराज महाले ,वाहन चालक बापू शिरसाठ,हे घटनास्थळी हजर झाली.त्यांनी ताबडतोब नाशिक येथे रेस्क्यू फोर्सला दूरध्वनी वरून माहिती देत कळविले.त्यानुसार रेस्क्यू टीम प्रमुख नासिक वैभव महाले, त्याचे सहकारी
तेही तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले.
तो8पर्यंत आजूबाजूला असलेले वस्तीवरील परिवार यांनी तिथेच रात्रभर थांबून होते.पहाटे चार वाजे दरम्यान एका बिबट्याने परिस्थितीचा अंदाज घेत पोल्ट्रीच्या भिंतीवरून पत्र्यावर चढून पळून जाण्यास यशस्वी झाला.राहिला दुसरा तर तोही स्वैरभैर अवस्थेत तिथेच फिरत होता.
फक्त रेस्क्यू फोर्स येण्याची वाट बघत होते फक्त दहा मिनिटाचा अवधी रेस्क्यू फोर्स तिथे पोहोचण्या आधीच दुसरा बिबट्याही पसार होण्यास यशस्वी झाला सर्व तिथे जमलेले वनविभाग टीमसहीत इतर जमलेले नागरिकांना अवाक नजरेने बघण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय उरला नाही.रेस्क्यू फोर्सला इतक्या दुरून येत रिकाम्या हाताने परतावा लागले.
जर ते दोन्ही बिबटे पकडले असते तर वस्तीवरील राहणारे नागरिकांची भिती दूर झाली असती.परंतु अजून त्यांची चिंता वाढली असून वनविभागाने त्वरीत पिंजरे लाऊन बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे.सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाचे वनरक्षक एस.एस.कामडी यांनी सांगितले की लवकर आम्ही या ठिकाणी पिंजरे लावणार असल्याचे त्यांनी सांगितले या संपूर्ण घटनेची माहिती श्रावण मोगल यांनी दिली आहे.



