नाशिक ग्रामीण

ब्रेकिंग चांदवड:शालेय 12 विद्यार्थ्यांना छोटा हत्ती ने उडविले, भीषण अपघात

चांदवड ब्रेकिंग

 

मनोज वैद्य / वेगवान नाशिक

१२ शाळकरी मुलांना छोटा हत्तीची धडक, चौघांची प्रकृती चिंताजनक ; जखमी विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली भेट….

दि.८ ऑगस्ट २०२५
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत होऊन चांदवडच्या दिशेने येत असलेल्या भरधाव वेगातील छोटा हत्ती या मालवाहू वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या १२ शाळकरी विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली आहे या धडकेत ४ शाळकरी मुले चिरडली असून इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
अति गंभीर जखमी विद्यार्थी नाशिकच्या रुग्णालयात हलवले असून काही विद्यार्थी चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या अपघाताची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना कळताच त्यांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे

Sahebrao Thakare

गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेत क्षेत्रात कार्यरत, सकाळ, ॲग्रोवन, साम, देशदूत, पुण्यनगरी, टीव्ही नाईन मराठी,सध्या वेगवान मिडीया ग्रुपचे संपादक म्हणून सध्या कार्यरत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, गुन्हेगारी, टेक्निकल, शेती, व्यवसाय विविध विषयांवर सखोल ज्ञान व लिखाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!