नाशिक जिल्ह्याच्या या तालुक्यात पावसाची हजेरी

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
चांदवड, ता. अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने चांदवड तालुक्यामध्ये हजेरी लावलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपू लागली होती मात्र अजूनही नाशिक जिल्ह्याचे अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील मोजके धरण वगळता नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक धरणे जी आहे, ती कोरडी ठाक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये या हंगामामध्ये सर्वात जास्त विक्रमी उत्पादन हे मकाचे घेण्यात आलेला आहे.
मका, सोयाबीन, भुईमूग तसेच इतर खरिपातल्या पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे .पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके जे आहे ते करपू लागलेले आहेत. दरम्यान रिमझिम पाऊस सुरू असला तरी पाहिजे त्या प्रमाणात जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.
आज चांदवड तालुक्यातल्या दक्षिण भागामध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक दिवसापासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळालाय. आज चांदवड तालुक्यातल्या दक्षिण भागामध्ये तब्बल 30 ते 45 मिनिट पावसाने हजेरी लावली.
यावर्षी पावसाने उघडीप दिल्यामुळे मका पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. कारण शेतामध्ये मक्का पीक जरी उभा असला तरी यावेळी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे जमिनीत ओलावा शिल्लक राहिला नव्हता . वातावरणाची अशी परिस्थिती पाहता एकरी 20 क्विंटल मका निघेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
6 Aug: पुढील ५ दिवसांत राज्यात अनेक जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस पडेल
खाली 🔲 दाखवल्याप्रमाणे ह्या ३ दिवसांत काही जिल्ह्यांत मध्यम-मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई ठाणे;पुढील ४८ तासांत मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता.
मराठवाड्यात पाऊस,ही चांगली बातमी.
:IMD



