दिंडोरीः पोलीसांनी केली मोठी कारवाई एवढ्या हजारांचा गांजा पकडला

वेगवान नाशिक / सागर मोर
वणी, ता. 6 आॅगस्ट 2025 -वणी – वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळाणे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ८१,हजार रुपये किमंतीचा साडे तीन किलो गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे आणि हेमंत राऊत यांच्या पथकाने कांतीलाल पांडू पालवी (वय ६२) यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी, एका पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीत ३.६५० किलो वजनाचा गांजासदृश्य सुका वनस्पतीजन्य पदार्थ आढळून आला. यात पाने, फांद्या, बिया आणि फुले होती, ज्याची किंमत अंदाजे ७३,हजार रुपये आहे.
पोलिसांनी गांजासोबतच मोबाईल फोनही जप्त केला, त्यामुळे एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ८१,हजार रुपये झाली आहे. कांतीलाल पालवी हा हा गांजा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
वणी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसायांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



