आरोग्य

दिंडोरी तालुक्यात अजब कारभार मुदत बाह्य औषधांची उघड्यावर विल्हेवाट

वेगवान नाशिक/सागर मोर

वणी :ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण तेथे मुदत बाह्य औषधे उघड्यावर टाकून जाळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहेत. ही केवळ एक साधी प्रक्रियात्मक चूक नसून, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या स्थापित नियमांचे हे गंभीर उल्लंघन आहे, ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि पर्यावरणाला मोठे धोके निर्माण झाला आहे

वणी ग्रामीण रुग्णालय नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येते या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी समस्या पासुन औषधे वितरण विजेचा स्वच्छतेचा प्रश्न नेहमी असतात हे ग्रामीण रुग्णालय समस्याचे आगार आहे.दि.५ ऑगस्ट २५ रोजी साडे अकरा वाजेच्या दरम्यान वणी ग्रामिण रुग्णालयाच्या आवारात मुदत बाह्य औषधे उघड्यावर टाकुन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मोठ्या प्रमाणात मुदत बाह्य झालेले औषधांचा साठा होता

औषधे उघड्यावर जाळता येतात का हे येथील रूग्णालयाच्या अधिक्षक यांना माहित नाही का वणी ग्रामिण रुग्णालयातील मुदत बाह्य औषधांचा मोठा साठा होता यात गोळ्या काही इंजेक्शन्स सुया अजुन बरेच साहित्य होते अश्या मुदत बाह्य औषधांचे वर्गीकरण करून मग विल्हेवाट लावायची असते परंतु येथील कर्मचा-यांनी ती तसदी घेतली नाही इंजेक्शन्सच्या सुया सुध्दा यात जाळण्यात आल्या ज्या ठिकाणी जाळण्यात येते त्याच्या बाजुला रहिवाशी वस्ती आहे त्या केमिकल युक्त धुरा मुळे त्यांना त्रास होऊ शकतो याची दक्षता घेण्यात आली नाही.

चौकट:-
औषधे “उघड्यावर” टाकल्याने एक अनियंत्रित परिस्थिती निर्माण होते, जिथे हे संभाव्यतः हानिकारक पदार्थ सहज उपलब्ध होतात. यामुळे मुलांद्वारे किंवा कचरा वेचकांद्वारे चुकून सेवन केले जाण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मुदत बाह्य औषधे, जर उघडी सोडली गेली, तर ती निरुपद्रवी दिसू शकतात, परंतु ती विषारी स्वरूपात बदलू शकतात किंवा अनपेक्षित प्रतिक्रिया देऊ शकतात. अशा प्रकारे, नियंत्रित वैद्यकीय कचरा एका अनियंत्रित सार्वजनिक धोक्यात रूपांतरित होतो. रुग्णालयाचा हा कथित कारभार, जिथे मुदत बाह्य औषधे उघडपणे जाळली जात आहेत, हे स्थापित आणि कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या वैद्यकीय कचरा व्यवस्थापन पद्धतींच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

सागर मोर

पत्रकार क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असून सी- न्यूज, दैनिक देशदूत, वेध न्यूज, उत्तर महाराष्ट्र टाईम न्युज, दैनिक लोकनामा या नामवंत न्यूज चैनल व दैनिकातून परिसरातील सामाजिक राजकीय शेतीविषयक असे लिखाण वेगवान न्यूज चैनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!