कार -बाईक

नाशिक:मोटारसायकल काही क्षणात गायब करणारे चोर सापडले

वेगवान मराठी / मारुती जगधने

नांदगाव,ता. दि १ ऑगस्ट 2025  नाशिक जिल्ह्याच्या सीमा लगत असलेल्या शिर्डी ,कोपरगाव, संगमनेर , या परिसरातील दुचाकी लक्ष ठेवून त्या चोरून नंतर नाशिक जिल्ह्यातील व इतर दुर्गम भागामध्ये त्यांची कमी किमतीत विक्री करणे यासारखे सर्रास प्रकार नाशिक जिल्ह्यासह इतर भागांमध्ये होत असल्याचे नाशिक पोलीस विभागाच्या निदर्शनास आले असून यासंदर्भात नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई करत चोरीच्या घटनेतील अनेक गुन्हे उघड केले असून सदर गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आलेला आहे.

नाशिक जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणारे चोरटे हे नगर जिल्ह्यातील असून ते चोरलेला दुचाकी नाशिक जिल्ह्यात दुर्गम भागात विक्री करताना करत असेनाशिक पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरिकांनी स्वागत केले आहे .याबाबत नाशिक ग्रामीण विभागाकडून मनमाड शहरातून मिळालेल्या माहितीवरून नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्र व जिल्ह्याचे सीमा वरती भागातून मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती घेतली असता वरदळीचे ठिकाणी बाजारपेठ, बँक ,हॉस्पिटल व शहरातील मुख्य रस्त्यांवर लक्ष ठेवून मोटरसायकल चोरी केले जाते व सदर चोरीच्या मोटरसायकल ह्या कमी किमतीच्या दारात अतिदुर्गम भागात विक्री केल्या जात असल्याची माहिती नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर यांनी मोटर वाहन मोटर सायकल चोरीचे वाढते गुन्ह्याचा आढावा घेऊन अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते त्यानुसार स्थापना शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथकावरील अधिकारी व ठाणेआम लदार हे घोटी सिन्नर महामार्गावर गस्त घालत असताना एका बिना नंबरची दुचाकी स्वार एक इसम भरदा वेगाने सिन्नर बाजूकडे येताना दिसला त्यास अडू न मो .सा .ची नंबर प्लेट व कागदपत्रांबाबत विचारणा केल्या असता त्याने उडाउळीचे उत्तरे दिली सदर इसम एक सुरज लक्ष्मण सातपुते वय 28 राहणार घोडेचार सोहळी पंपिंग नाशिक रोड नाशिक यास विश्वासा त घेऊन मोटरसायकल बाबत चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही त्याचा मित्र रोहित अशोक पवार वय 27 राहणार वांजुळफुई तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर याच्याकडून सदर मोटरसायकल घेतली असल्याचे सांगण्यात आले.

सदर इसम नामे रोहित अशोक पवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने नाशिक जिल्ह्याचे सीमावरती भाग कोपरगाव ,शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करून सदर चोरीच्या मोटरसायकल त्यांचे नाशिक जिल्ह्यातील मित्र त्यांचे मार्फतीने सीमेलगतचे तालुका व अतिदुर्गम भागात कमी किंमतीचे दरात विक्री केल्याची कबुली दिली.

सदर इसम नामे रोहित अशोक पवार यास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले असून त्याने कबुली दिल्यावरून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका व नाशिक रोड परिसरात विक्री केलेल्या चोरीच्या दोन हिरो एम एच डीलक्स, दोन होंडा शाइन, एक होंडा, युनिकॉर्न दोन, टीव्हीएस स्टार सिटी एक , हिरो स्प्लेंडर एक, बजाज प्लेटिना एक ,सुझुकी एक्सेस अशा एकूण दहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेले आहे सदर चोरीच्या मोटरसायकली विना नंबर प्लेट व विना कागदपत्र खरेदी करणारे नाशिक जिल्ह्यातील एकूण आठ इस मानविरुद्ध घोटी पोलीस ठाणे महाराष्ट्र पोलीस . कलम 144 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे यातील आरोपी रोहित अशोक पवार राहणार वांजुळझुई तालुका राहुरी याने कबुली दिल्यावरून आहिल्या नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले चोरीचे एकूण सहा गुन्हे ओळखीस आले आहेत सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून मोटरसायकल चोरी आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे याबाबत नाशिक पोलिसांनी आव्हान केले की नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही इसम विना नंबर प्लेट किंवा विना कागदपत्र कमी किमतीचे दारात मोटरसायकल विक्री करत असेल तर अशा इसमानची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे कोणीही चोरीच्या मोटरसायकल खरेदी अथवा विक्री करू नये असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आपापल्या मोटरसायकल हँड लॉक ‘ सेफ्टी लॉक बसून घ्यावे तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे आव्हान नाशिक जिल्हा विभागाकडून करण्यात आले आहे .

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!