कार -बाईक

बेवारस उभ्या असलेल्या कारची चर्चा

बेवारस उभ्या असलेल्या कारची चर्चा

वेगवान नाशिक / मारुती जगधने

वेगवान मराठी : दि 28 जुलै नांदगाव शहरातील मनमाड रोडवरील फुलेनगर परिसरात एक टोयोटा कंपनीची चारचाकी कार (SUV) गेल्या पाच दिवसांपासून बेवारस स्थितीत उभी आहे.
या कारकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले असून, त्यामुळे परिसरात चिंता आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारचे नंबर प्लेट आहे मात्र वाहन मालक किंवा चालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. वाहनात कुणीही नसल्याचे दिसून आले असून, गाडीचे दरवाजे लॉक अवस्थेत आहेत.
वाहनाच्या आजूबाजूला स्थानिक नागरिकांनी संकुचित वाहतुकीचा त्रास जाणवू लागला आहे, तसेच सुरक्षा बाबतही चिंतेचा विषय बनला आहे.

फुलेनगर परिसरातील कामगार पोली स पाटील व नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट दे उन वाहनाची पाहणी करून . सदर वाहन चोरीचे आहे का, किंवा त्याचा वापर अन्य कुठल्या गुन्ह्यासाठी झाला आहे का याची चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

नागरिकांची मागणी : सदर वाहन त्वरित हटवावे, वाहनाचा शोध घेऊन त्यामागचा उद्देश स्पष्ट करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून नागरिकांना माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!