नाशिक ग्रामीण

लासलगाव:गावठी कट्टा व काडतूसांसह दोघांना अटक

वेगवान नाशिक / अरुण थोरे

निफाड,ता. 25 जुलै 2025-0लासलगाव व येवला पोलिसांनी संयुक्त धाडशी कार्यवाही करत गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसांसह दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एक मोबाईलसह एकूण ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.२४ जुलै रात्री १०.२२ वाजता पाटोदा ता.येवला परिसरात ऋषिकेश मोतीराम माळी, वय २४, रा.आंबेगाव ता.येवला आणि सोपान निवृत्ती जगताप, वय ३२, रा.मरळगोई ता. निफाड हे दोघे गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या दिशेने हालचाल केली. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्याकडे स्टील बॉडी असलेला चॉकलेटी प्लॅस्टीक हँडलचा गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे व एक रेडमी कंपनीचा मोबाईल आढळून आला.

या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३५,९०० रुपये इतकी असून, पोलिसांनी सर्व सामग्री जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या सोपान जगताप याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा, जळगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा तर लासलगाव पोलीस ठाण्यात दरोडा, गैरप्रवेश, धमकी व नुकसान यासंदर्भातील गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. येवला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप मंडलिक, लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि भास्करराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, पोलीस शिपाई सुजय बारगळ आणि संदीप डगळे ,पोलीस नाईक सचिन वैरागर, पोलीस शिपाई सागर बनकर, पंकज शिंदे, दिपक जगताप, चालक राजु दुबे आदींच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान हीही उल्लेखनीय कारवाई केली.

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!