वावी पोलिस स्टेशन समोर कांदळकर कुटुंबाचे उपोषण… आज दुसरा दिवस अद्याप दखल नाही
आठ दिवसांत दोन वेगवेगळे उपोषण... वावी पोलिस विरोधात संताप व्यक्त,,,

वेगवान मराठी / भाऊसाहेब हांडोरे
आठ दिवसांत दोन वेगवेगळे उपोषण… वावी पोलिस विरोधात संताप व्यक्त,,,
यापूर्वी लक्ष्मणपुर येथील दिव्यांग ग्रामपंचायत सदस्य पंकज पेटारे यांनी याच पोलिस स्टेशन समोर लाक्षणिक उपोषण केले होते…
न्याय मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकाला उपोषण करावं लागतं हे दुर्दैव आहे… मागुन न्याय मिळत नसेल तर संघर्ष अटळ आहे असे मत सुज्ञ नागरिक करत आहे.. लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा….
सिन्नर दि. 25 जुलै 2025 — महिना होऊन ही आरोपी वर कुठलीही कारवाई केली जात नाही उलट सर्वसामान्य जनतेला अन्यायाविरुद्ध आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.असाअरोप करतं शहा येथील धनगर समाजाचे शेतकरी कुटुंब वावी पोलिस स्टेशन समोर उपोषणाला बसले आहेत.. आज उपोषणाचा दुसरा दिवस होऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही तर उलट आरोपी वर कारवाई करायची सोडून पोलिस उपोषण कर्तावर दबाव आणून उपोषण मोडीत काढण्याचा डाव पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे…
महिन्यापूर्वी शहा येथील सुदाम कांदळकर हे आपल्या जमिनीत मशागतीची कामे करत असतांनाच बाजुवाले संजय म्हस्के यांनी स्व:ताची चार चाकी गाडी शेतातुन चालवत नेण्याचा प्रयत्न करत असतांनाच सुदाम कांदळकर यांनी त्यांना हटकले असता संजय म्हस्के यांनी मागचा पुढचा विचार न करता लाठ्या काठ्या घेऊन श्री, कांदळकर यांना मारहाण केली त्यात ते जबर जखमी झाले आहेत.. व इतर सदस्य जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना ही मारहाण करण्यात आली… या संदर्भात वावी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींनी न्याय मागण्यासाठी वावी पोलिस स्टेशन समोर उपोषणाला सुरुवात केली आहे.. उपोषणाचा आज दुसरा दिवस उजाडला असुन अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे हताश झालेला कुटुंबावर अन्याय होत असल्याची चर्चा परीसरात सुरू आहे.. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असे मत दत्तात्रय सुदाम कांदळकर यांनी व्यक्त केले आहे…



