शेती

शेतकरी म्हणताय ट्रान्सफॉर्मर देतेय का कोणी ट्रान्सफॉर्मर!!!

शेतकरी म्हणताय ट्रान्सफॉर्मर देतेय का कोणी ट्रान्सफॉर्मर!!!

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव

येवला दिनांक :- 22 जुलै 2025!

सायगाव (ता. येवला) – निमदरी वस्ती येथील ढानगाई ट्रांसफार्मर क्रमांक दोन (100 के.व्ही.ए.) वारंवार जळत असल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शेती पंपांवर वाढलेल्या लोडमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी सुरु न होता शेतीचे काम खोळंबले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सध्याच्या ठिकाणीच जुना ट्रान्सफॉर्मर ठेवून जवळच्या निमदरी वस्ती या ठिकाणी 100 के.व्ही.ए. चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ही मागणी लेखी स्वरूपात केली होती. त्यानुसार, माननीय मंत्र्यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, मनमाड यांना नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र आज दोन वर्षांनंतरही हा आदेश अद्याप अमलात आणलेला नाही.

या संदर्भात शेतकऱ्यांनी मंत्री श्री. भुजबळ यांच्या शासकीय विशेष कार्यकारी अधिकारी भामरे यांच्याकडे पुन्हा तक्रार नोंदवली. तसेच, विद्युत अभियंता पाटील यांच्याही लक्षात ही बाब आणून दिली असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

*”ट्रांसफार्मर साठी दोन दोन वर्षाची प्रतीक्षा करूनही तो मिळत नाही. शेतकऱ्यांना वारंवार वीज बंद पडल्याने खोळंबा होत आहे.. सध्या असलेला ट्रान्सफॉर्मर अतिशय धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा व जुना दुरुस्त करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.”*- भागवतराव सोनवणे,
शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक

*************

रत्नाकर भालेराव,अशोक ढाकणे,कौशीराम गायकवाड,संजय ठोंबरे,बाळनाथ खैरनार,जयराम खैरनार,बापू देवरे,पिनू देवर,अरुण भालेराव,रामदास भालेराव,नितीन भालेराव,कानिफनाथ भालेराव,संदीप भालेराव,संजय भालेराव,दिलीप जेजुरकर,गणेश गायकवाड,कपिल भालेराव,प्रवीण खैरनार,विलास ढाकणे,अरुण गायकवाड,प्रकाश भालेराव,रघुनाथ भालेराव या शेतकऱ्यांची नवीन ट्रान्सफॉर्मर ची मागणी आहे. नवीन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर 8 दिवसात बसवून न दिल्यास महावितरण ला आपल्या पद्धतीने झटका देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!