येवल्यात उत्तर पूर्व भागात वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी चा प्रत्यय…
येवल्यात उत्तर पूर्व भागात वृक्ष-वल्ली आम्हा सोयरी चा प्रत्यय...

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला, दि. 08 ऑक्टोबर 2025
पर्यावरण संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकास यांचा संगम घडवणारा उपक्रम येवला तालुक्यात सुरू झाला आहे. तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या हद्दीत पद्धतीने तब्बल 3 लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी एकूण 60 कोटी रुपयांची रोजगार हमी योजनेतुन आगामी 3 वर्षात होणार असून त्यापैकी 90 टक्के रक्कम (सुमारे 54 कोटी रुपये) ही थेट स्थानिक मजुरांच्या खात्यात मजुरी च्या रूपाने जाणार आहे.
प्रत्येक झाडाच्या तीन वर्षांच्या संगोपनासाठी 2,000 रुपये खर्च अपेक्षित आहे.
सप्रेम अशासकीय संस्था, डॉर्फ केटल, नवदृष्टी संस्था आणि पंचायत समिती येवला यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारम येथे 1,000 आंब्याची लागवड पूर्ण झाली आहे.
*********
“मानवाने विकासाच्या नावाखाली सुरु केलेला निसर्गाचा विनाश विध्वंसामध्ये रूपांतरित झाला आहे.
पर्यावरण संवर्धन ही फक्त काळाची गरज राहिली नसून जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठीची लढाई बनली आहे.”
— संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, येवला
###########
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरीचा प्रत्यय येवल्याच्या उत्तर पूर्व भागात येतोय. या परिसरात झाडे लावल्याने भुजल पातळीत वाढ होणार आहे. शुद्ध हवा आणि ऑक्सिजन ची मुबलता यामुळे आरोग्यदायी हवामान होणार आहेत.उन्हाळ्यात उघडी बोडकी वाटणारी गावे आता हरित आणि सुंदर होणार आहे. या शिवाय खात्रीशीर रोजगार गावातच मिळून झाडापासून ग्रामपंचायतीचे सुद्धा उत्पन्न वाढणार आहे.
:- भागवतराव सोनवणे, संयोजक जलहक्क संघर्ष समिती, येवला
###########
येवला तालुक्यातील प्रत्येक गावात होणार ‘वृक्ष क्रांती’
रेंडाळे: एकूण 26,000 झाडे लावणार; 7 हजार झाडांची लागवड पूर्ण
वाई बुथी: एकूण 25,000 झाडे लावणार; 3 हजार 500 झाडांची लागवड पूर्ण
वडगाव बल्हे इथे एका एकरात मियावाकी पद्धतीने लागवड पूर्ण — तालुक्यातील पहिली सघन लागवड
तसेच इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात लागवड नियोजित आहे.
#########
मजु्रांना प्रोत्साहन देण्यासाठी
“मँगो कप स्पर्धा” आयोजित करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी किंवा मजुरांनी झाडे चांगली वाढवली, त्यांना सलग तीन वर्षे मजुरी देऊन गौरविण्यात येणार आहे.
चौथ्या वर्षापासून झाडांपासून होणाऱ्या उत्पन्नाचा 50% ग्रामपंचायतीला आणि 50% मजुरांना मिळणार आहे.
सध्या 30 ग्रामपंचायतींचे नियोजन पूर्ण झाले असून, आणखी 40 ग्रामपंचायती सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
या माध्यमातून येवला तालुका “हरित, समृद्ध आणि स्वावलंबी” करण्याचे उद्दिष्ट साधणार आहे.
######
काय आहे मियावाकी फॉरेस्ट ❓
जपानचे वनशास्त्रज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांनी विकसित केलेली सघन लागवड पद्धत म्हणजे मियावाकी फ़ॉरेस्ट.. या मध्ये स्थानिक 40–42 जातींच्या झाडांची दाट लागवड (एका एकरात साधारण 10,000 झाडे)
झाडे 3–5 फूट अंतरावर लावली जातात, नैसर्गिक जंगलासारखी एकमेकांत मिसळून वाढतात
नैसर्गिक जंगलापेक्षा 10 पट जलद वाढ व 30 पट अधिक घनदाट वनस्पती वाढतात. ही झाडे वर सूर्यप्रकाश आणि खाली जमिनीत पाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत वेगाने वाढतात… यातून स्थानिक पक्षी प्राणी यांना आसरा तयार होतो.
तापमान नियंत्रण होऊन जैवविविधता वाढते.
********************



