नाशिक ग्रामीण

ते येतात,अपरात्री दरवाजा ठोठावून…. गोदाकाठी रात्रीस खेळ चाले

शरद शेळके / वेगवान नेटवर्क

सिन्नर, ता. 29 जुलै 2025  सिन्नर व निफाड तालुक्यात गोदाकाठी अलीकडच्या काही आठवड्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून, गावोगाव चोरट्यांनी नागरिकांना बेदम मारहाण करत काही ठिकाणी दरोडे टाकले आहेत तर काही ठिकाणी नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोड्यांचे प्रयत्न असफल झाले आहेत. यामुळे शेत वस्तीवर राहणारे शेतकरी भयभयीत झाले आहेत. घरफोड्या, दुचाकी चोरी, शेतातील पाण्याच्या मोटारींची चोरी यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

चोरटे शेतवस्त्यांवरील घरे टारगेट करत रात्रीच्या वेळी घरांचा दरवाजा ठोठावून आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. घरातील सदस्यांना मारहाणही करतात.

स्थानिक पोलीस यंत्रणा गस्त वाढवण्याचा प्रयत्न करत असली, तरीही चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

मोबाईल व सोशल मीडिया मुळे ग्रामीण भागातील नागरिक सध्या जागरूक झालेले आहेत.नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे पिंपळगाव रस्त्यावरील कातकाडे वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न कातकाडे कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पाडला. ग्रामस्थांची चाहूल लागताच चोरटे आल्या वाटेने पसार झाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तळवाडी-पिंपळगाव रोडवर बळीराजा हायटेक नर्सरी येथेही अशाच प्रकारे चोरीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता.तेथील नागरिकांनी चोरट्यांना मक्याच्या शेतामधून पळून जातानाही बघितले होते. निफाड तालुक्यातील मांजरगाव, महाजनपूर येथेही दरोड्याचे प्रयत्न झाल्याचे समजते. सायखेडा पोलिसांनी त्या-त्या ठिकाणी भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज भासत आहे. अन् अजून पोलीस यंत्रणा वाढवायची सक्त गरज भासत आहे.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!