नाशिक ग्रामीण

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर — स्थानिक राजकारणात हालचालींना वेग

Nandgaon News

  •  जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर — स्थानिक राजकारणात हालचालींना वेग
वेगवान मराठीः मारुती जगधने 
॥ दिः 16 ऑक्टोबर 2025 ॥

नांदगाव (ता. नांदगाव) : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नांदगाव तालुक्यातील गटनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार —

४०) साकोरा गट – सर्वसाधारण (स्त्री)
४१) न्यायडोंगरी गट – सर्वसाधारण
४२) भालुर गट – सर्वसाधारण
४३) जातेगाव गट – सर्वसाधारण (स्त्री)

या प्रारूप आरक्षणानुसार काही गटांमध्ये महिला उमेदवारांना संधी मिळाल्याने स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

मागील निवडणुकीत साकोरा गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून रमेश  बोरसे हे निवडून आले होते. मात्र, यावेळी ही जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने काकांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे “काका आता काकींना उमेदवारी देतील का?” अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

दरम्यान, साकुरी ता मालेगाव व साकोरा ता . नांदगाव पैकी एका  गटातून विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुमताई कांदे या इच्छुक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यामुळे साकोरा व साकुरी या दोन्ही पैकी एका कोणत्या गटात   सौ. कांदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित होतें . 

न्यायडोंगरी गटात, मागील वेळेस माजी आमदार अनिल आहेर यांच्या कन्या . अश्विनी आहेर या निवडून आल्या होत्या. सध्या अनिल आहेर व विलास आहेर हे दोघेही आमदार सुहास कांदे यांच्या सोबत असल्याने, या वेळेस उमेदवारीसाठी माजी सभापती श्रीमती विजया आहेरबाजार समिती सभापती दर्शन आहेर किंवा अॅड. अमोल आहेर यांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भालूर गट, जो मागील निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित होता, या वेळेस सर्वसाधारण झाला आहे. या गटात माजी आमदार संजय पवार यांचे वर्चस्व असून, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासवासी साहेबराव पाटील यांचा प्रभावही या भागात होता. त्यामुळे आता भालूरमधून कोण उमेदवार उभा राहणार याबाबत चर्चा सुरु आहे.

जातेगाव गट पुन्हा एकदा महिलांसाठी आरक्षित झाल्याने, येथे कोणत्या महिला उमेदवाराला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. अद्याप या गटातून कोणतेही नाव चर्चेत आलेले नाही.

नांदगाव तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने, विद्यमान आमदार सुहास कांदे हे कोणकोणास उमेदवारी देतात, त्या तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर येण्याच्या दृष्टीने आमदार कांदे हे आग्रही असल्याचे दिसून येते .

यावर तालुक्यातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

दरम्यान राजकारणातील बेरजेचे  समीकरण करणारे ज्येष्ठ नेते सहकारातले जाणकार प्रकाश तथा बापूसाहेब कवडे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मध्ये कवडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानले जाते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!