
तासगाव घटनेचा नांदगावला निषेध
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव दि .9 सप्टेंबर 2025
मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे झालेल्या घटनेत समाजातील जागीर कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदगाव होलार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत होलार समाजाच्या प्रतिनिधींनी नांदगाव पोलिस स्थानकात निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, मांजर्डे गावात गणपती बसविण्याच्या वेळी किरकोळ वाद झाला. लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने संबंधितांनी संतापून जाबीर कुटुंबियांस जातिवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे समाजाची भावना दुखावली असून, संबंधित दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय होलार संघटना नांदगाव यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, निवेदनावर रवींद्र विलास सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.



