शेतकऱ्यांनो सावधान; चोरांचा आता शेतातील उभ्या पिकावर डल्ला
पिंपळगाव वाखारी येथील घटना

शेतकऱ्यांनो सावधान; चोरांचा आता शेतातील उभ्या पिकावर डल्ला
मनोज वैद्य / देवळा
शेतकऱ्यांनो आता सावधान रहा, चोरांचा आता तुमच्या शेतातील उभ्या पिकांवर डोळा असून देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथे शेतातील तुर पिकाची चोरी करून चोरांनी पोबारा केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील बिरोबा पांधी शिवारातील शेतकरी व एनडीसीसी बँक कर्मचारी एस एल पाटील (बाळासाहेब पाटील) यांच्या शेत गट नंबर 1251 मधील क्षेत्रात त्यांनी तूर या पिकाची लागवड केली होती.
सध्या त्या तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा आल्या होत्या व या पिकाला भावही मिळत असल्याने अज्ञात चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तुरीच्या झाडाला आलेल्या शेंगाच तोडून नेल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत सदर शेतकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी एक क्विंटल च्या आसपास शेंगा तोडून चोरून नेल्या आहेत तरी सदर घटनेबाबत पासून बोध घेऊन इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची रखवाली करणे गरजेचे आहे.



