नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

भाजपा नांदगाव मंडळ व महिला मोर्चाच्या वतीने विविध प्रशासकीय समस्यांबाबत निवेदन

Nandgaon news

भाजपा नांदगाव मंडळ व महिला मोर्चाच्या वतीने विविध प्रशासकीय समस्यांबाबत निवेदन
वेगवान मराठी : मारुती जगधने दि 19 August2026
तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनसह विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाबाबत कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल; वरिष्ठ मंत्री महोदयांच्या भेटीद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा

:
भारतीय जनता पार्टी नांदगाव मंडळाच्या वतीने दर महिन्याला आयोजित करण्यात येणाऱ्या मासिक संघटन बैठकीमध्ये गेल्या महिन्यात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जातात. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांकडे निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याच अनुषंगाने भाजपा नांदगाव मंडळाचे तालुका अध्यक्ष संजय बबनराव सानप यांच्या वतीने तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाबाबत तसेच महसूल, पुरवठा, नोंदणी, जन्म-मृत्यू दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, शासकीय योजना आदी कामांबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.

तसेच भाजपा महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रेखा अशोक शेलार यांच्या वतीने नांदगाव तालुक्यातील अवैध दारूविक्री, दारूबंदी, मटका-जुगार, गुटखा-तंबाखू विक्री, अवैध धंदे तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विविध बाबींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले.

मासिक संघटन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी या कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून सामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, पारदर्शक प्रशासन आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे नियमाप्रमाणे, वेळेत व पारदर्शक पद्धतीने व्हावीत, तसेच अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई व्हावी, अशी भाजपा नांदगाव मंडळाची भूमिका आहे.

या सर्व प्रश्नांवर केवळ निवेदन देऊन न थांबता, संबंधित विभागांकडून कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून आवश्यकतेनुसार भाजपा नांदगाव मंडळ व महिला मोर्चाचे शिष्टमंडळ वरिष्ठ मंत्री महोदयांची भेट घेऊन तालुक्यातील या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या कमी करून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.

“सामान्य नागरिकांच्या समस्या हीच आमची प्राथमिकता असून, प्रशासनाने नियमाप्रमाणे पारदर्शक आणि तत्पर कार्यवाही करावी, यासाठी भाजपा नांदगाव मंडळ सातत्याने प्रयत्नशील राहील,” अशी भूमिका भाजपा नांदगाव मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.यावेळी मा शहर अध्यक्ष राजीव धामणे तालुका उपाध्यक्ष अशोक पेंढारकर ,बाबाजी शिरसाठ मंडल महामंत्री सचिन पांडे मंडल सचिव शरद उगले मंडल कोषाध्यक्ष रवींद्र नगरकर obc तालुका अध्यक्ष दिनेश जेजुरकर,obc युवा मोर्च्या ता अध्यक्ष शुभम सौंदाणे,वकील आघाडी तालुका अध्यक्ष adv शेखर पाटील शहर अध्यक्ष सतिष शिंदे यांचे सहीचे निवेदन तालुका अद्यक्ष संजय सानप व महिला अध्यक्ष रेखा शेलार यांच्या द्वारे देण्यात आले यावर शासनाने त्वरित कार्यवाही करावी व असे प्रकार घडू नये यासाठी भाजपा नांदगाव तालुका शिष्टमंडळ घेऊन प्रदेश अद्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचेकडे भेट घेऊन परिस्थिती मांडणार आहे असे तालुका अद्यक्ष संजय सानप यांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!