नांदगाव येथून नस्तनपूरसाठी पायी दिंडी उत्साहात रवाना; फुलेनगर परिसरात भक्तिमय
Nandgaon News

नांदगाव येथून नस्तनपूरसाठी पायी दिंडी उत्साहात रवाना; फुलेनगर परिसरात भक्तिमय
वेगवान मराठी दि 17 ऑगस्ट2026
नांदगाव:
येथील फुलेनगर परिसरातून श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी नस्तनपूर येथे जाणाऱ्या पायी दिंडीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.
सजविलेली पालखी, हातात घेतलेले भगवे ध्वज आणि टाळ-मृदंगाचा गजर यांमुळे संपूर्ण परिसर हरिनामाच्या आणि शनिदेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या दिंडीमध्ये महिला व पुरुष भाविकांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी व भाविकांनी पालखीचे जंगी स्वागत केले. भाविकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि भजनाच्या सुरांनी परिसरात धार्मिक व चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी निघालेल्या या पायी दिंडीने संपूर्ण परिसरात भक्तीचा नवा उत्साह भरला.



