लोकल बातम्या

सिन्नर च्या सोमठाणे येथे आज ” विराट सकल हिंदू महासंमेलन.. !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर. दि ; 23 मार्च 2026 — सिन्नर , दि : 22 मार्च 2026 — आज सकल हिंदू महासंमेलन आयोजित…. सोमवार 23 मार्च रोजी सिन्नर च्या सोमठाणे येथे ” विराट सकल हिंदू महासंमेलन आयोजित केल्याची माहिती सकल हिंदू महासंमेलन समितीने दिली आहे.

सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे आयोजित केलेल्या विराट हिंदू महासंमेलनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाला धर्म योद्धा डॉ.सुरेश चव्हाणके व श्रीनिवास जी पुल्लैया ( प्रांत धर्म जागरण प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली महंत श्री रमेश गिरी महाराज ( स्वामी जनार्दन महाराज , बेट – कोपरगाव आश्रम ) . महंत न्याय वेदांतचाचार्य , १००८ स्वामी देवानंद गिरी महाराज ( आनंद वन आश्रम सांगवी ) . महंत १००८ पंडीताध्या शिवाचार्य महाराज ( वडांगळीकर ).
महंत श्री १०८ जनेश्वरानंदगिरी महाराज ( विचुंर आश्रम ) .हा.भ.प. श्री.संतोषभाऊ जाधव. केंद्र प्रमुख श्री.स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद.कारवाडी . राहुल जी महाराज मालपाणी ( दत धाम आश्रम पंचाळे .) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाला तमाम हिंदू बांधवा व शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.सुरेश चव्हाणके यांनी केले आहे…
सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे होत असलेल्या हा कार्यक्रम वज्रेश्वरी माता मंदिराजवळ सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळात होणार असल्याची माहिती समिती प्रमुखांनी दिली आहे.
भाऊसाहेब हांडोरे सिन्नर

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!