Uncategorizedनाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नांदगांव नजीक अपघात 4 गंभीर

Nandgaon news

 

नांदगांव नजीक अपघात 4 गंभीर

वेगवान मराठी : मारुती जगधने

दि . २० मार्च 2026

नांदगाव तालुक्यातील नांदगाव मनमाड रोडवरील नॅशनल हायवेवर फुलेनगर येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 20 मार्च) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 41 एल 5613 क्रमांकाची प्लेटिना आणि पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतीच खरेदी केलेली टीव्हीएस कंपनीची नवी दुचाकी या दोन गाड्या मनमाडहून नांदगावकडे एकामागून एक जात होत्या. यावेळी मागील गाडीने पुढे जाणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दोन्ही दुचाकी सुमारे 100 ते 125 फूट अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विखुरल्या गेल्या.
या अपघातात दोन्ही गाड्यांवरील चारही जण गंभीर जखमी झाले असून काहींना डोक्याला मार लागला आहे, तर हात व पायांना देखील गंभीर दुखापती झाल्या आहेत.
घटनेनंतर फुलेनगर येथील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविले. जखमींपैकी दोघे हिरेनगर (ता. नांदगाव) येथील असून उर्वरित दोघे मल्हारवाडी, नांदगाव शहर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!