निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर निकाळे यांची बिनविरोध निवड

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद, दि.२८ फेब्रुवारी :- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न निफाड तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सागर निकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी बाजीराव खैरनार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचे अमलाखाली बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक ॲड.रामनाथ शिंदे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार यशवंतराव पवार, शेखर देसाई, नामदेवराव रायते, किशोर पाटील, अरुण खांगळ यांनी मनोगत व्यक्त करत संघाच्या कार्याचा धावता आढावा घेतला. सर्व सभासदांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेत निर्धारित मुदतीत प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी खैरनार यांनी केली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – सागर निकाळे, कार्याध्यक्ष – प्रमोद तुपे, उपाध्यक्ष – संदीप शिरसाठ, आशिफभाई पठाण, सरचिटणीस – रोहीदास गायकवाड, सहसरचिटणीस – दिलीप घायाळ, खजिनदार – योगेश अडसरे, सहखजिनदार – जगन्नाथ जोशी, संघटक – सुभाष गायकवाड, सहसंघटक – भारत मोगल, समन्वयक – रणजित गुंजाळ, कार्यकारिणी सदस्य म्हणून – लक्ष्मण पडोळ, ज्ञानेश्वर सांगळे, भगिरथ घोटेकर, राजेंद्र पवार आदींचा समावेश आहे.
बैठकीस निलेश देसाई, हारुणभाई शेख, रविंद्र जाधव, अजिंक्य जगताप, मानिक देसाई, संजय साठे, पंकज कायस्थ, भाऊसाहेब हुजबंद, दादाभाई काद्री, अथर्व पडोळ, प्रकाश जाजू, नितीन गायकवाड, दीपक घायाळ, बाबासाहेब गिते, समीर पठाण, राहुल दवते, गणेश ठाकरे, उमेश पारीख, राकेश बोरा, अरुण गायकवाड, दिगंबर वडघुले, पंढरीनाथ सोनवणे, पुष्कर भन्साळी, शरद जाधव, सोमनाथ चौधरी, अरुण थोरे आदी पत्रकार उपस्थित होते. किशोर पाटील यांनी आभार मानले.



