नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

पंचक्रोशीत चोरीचा सिल्सिला कायम ? पोलिसांचा तपास मात्र शून्य ?

Nandgaon news

पंचक्रोशीत चोरीचा सिल्सिला कायम ? पोलिसांचा तपास मात्र शून्य ?

वेगवान मराठी : मारुती जगधने 
दिनांक 24 फेब्रुवारी 2026

नांदगाव:दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पेंढारकर बाबांच्या हातातील 27 ग्रॅम सोने री अंगठी चोरी गेले सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी अग्रवाल या व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाख रुपये चोरट्याने दुपारच्या वेळेला पळवले हे दोघेही चोरटे एकच स्वरूपातील होते आणि त्यानंतर आज दिनांक 24 रोजी देखील काकळीज नामक शेतकऱ्या च्या मोटरसायकलच्या डिक्कीतून तीन लाख रुपये भामट्याने पळवले ते देखील दुचाकी स्वारच होते यावरून आता चोरट्यांना भामट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही नांदगाव शहर व परिसरात मध्ये राजरोस चोऱ्या होत आहेत पोलिसांचा तपास मात्र शून्य ? नांदगाव पंचक्रोशी मध्ये चोरीचा सिलसिला कायम ?परंतु फिर्यादी ची उलट तपासणी केली जात असल्याने काही लोक चोरीच्या घटनेची फिर्याद देण्यास पुढे येत नाही ?.

नांदगाव परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, भरदिवसा घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यभान रामचंद्र काकळीज (वय ६४ वर्षे, रा. तांदुळवाडी, ता. नांदगाव) हे सेवानिवृत्त असून शेती करतात. मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली ३ लाख रुपयांची रोकड एका पिशवीत ठेवून ती स्कुटीच्या डिक्कीत ठेवली होती. ही स्कुटी त्यांच्या घरासमोर उभी असताना, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून डिक्कीतील रोकड लंपास केली.

चोरीचा तपशील

  • चोरी गेलेली रक्कम: ३,००,००० रुपये (५०० रुपयांच्या ६०० नोटा).
  • संशयित आरोपी: राखाडी रंगाच्या ‘हिरो शाईन’ मोटारसायकलवरून आलेले २ अज्ञात इसम आणि दुसऱ्या एका मोटारसायकलवरील २ अज्ञात इसम अशा एकूण ४ जणांवर संशय व्यक्त केला जात आहे.
  • घटनास्थळ: तांदुळवाडी शिवार, ता. नांदगाव, जि. नाशिक.

पोलीस कारवाई

​या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे (मो. नं. ९८९०१५४१६१) करत आहेत.

​भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तांदुळवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू व रोकड हाताळताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!