नाशिक ग्रामीण

चांदोरी येथे गोदावरी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद:- चांदोरी येथील रहिवासी रवींद्र गंगाराम झुरडे (वय ३८) यांचे गोदावरी नदीत पाण्यात पडून दुर्दैवी निधन झाले. सदरील प्रेत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, झुरडे हे गोदावरी नदी परिसरात असताना अचानक तोल जाऊन नदीत पडले. गोदावरी नदीतील पानवेली मध्ये झुरडे यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने शोधकार्य सुरू केले,
या घटनेची नोंद सायखेडा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. घुगे , पोलिस उपनिरीक्षक पी. के.अढांगळे, पोलिस हवालदार नाईक , पोलिस अंमलदार गांगुर्डे व शोध कार्य करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख व किसन जाधव , फकिरा धुळे ,वैभव जमधडे, विलास गांगुर्डे, सुरज पगारे, सोमनाथ कोटमे, सचिन कांबळे , राजेंद्र टर्ले व पोलिस पाटील अनिल गडाख, ग्रामपालिका सरपंच विनायक खरात , सदस्य रवींद्र बदादे व ग्रामस्थ उपस्थित होते. मयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!