नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

या तालुक्यात पोलिसांची कारवाई – . 3 लाख ७ ह .रू माल जप्त .

या तालुक्यात पोलिसांची कारवाई – १५ किलो गांजा जप्त

  • वेगवान मराठी : मारुती जगधने
[दि . 20 सप्टेंबर 2025 ]

मालेगाव तालुक्यातील ४० गाव रोड परिसरात गिगांव फाट्याजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत १५ किलो ३७१ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी शरद हिरालाल शिंदे (वय ४५, रा. शिरूर, जि. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत ३ लाख ७ हजार ४२० रुपये इतकी असून वाहतुकीसाठी वापरलेली बजाज सिटी ११० मोटारसायकल (किंमत सुमारे ४२ हजार रुपये) देखील जप्त करण्यात आली आहे.

सदर इसमाकडून परवानगीशिवाय बेकायदेशीर गांजा बाळगणे व वाहतूक करणे आढळल्याने त्याच्याविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. ८८७/२०२५, एमडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब), २०(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर, अपर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे आदी पथकाने केली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मालेगाव पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!